*विजय चौधरी यांच्या नेतृत्वाशिवाय कार्यकर्ते पोरकेच, आमदार राजेश पाडवी यांची भावना,पुन्हा सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विजय चौधरी यांच्या नेतृत्वाशिवाय कार्यकर्ते पोरकेच, आमदार राजेश पाडवी यांची भावना,पुन्हा सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह*
*विजय चौधरी यांच्या नेतृत्वाशिवाय कार्यकर्ते पोरकेच, आमदार राजेश पाडवी यांची भावना,पुन्हा सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्नेहमेळाव्यात मनोगत व्यक्त करताना आमदार राजेश पाडवी म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रही त्याला अपवाद नाही. विजय चौधरी यांनाही अशाच कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. मात्र त्यांच्यातील सहनशीलता, जिद्द आणि कुटुंबीयांनी दिलेली भक्कम साथ यामुळे ते आजही खंबीरपणे उभे आहेत. काही महिने ते पक्षकार्यातून अलिप्त राहिल्याने जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील कार्यकर्त्यांनाही नेतृत्व हरवल्यासारखे वाटत होते.
विजय चौधरी यांच्या मनात पक्षाविषयी असलेली तळमळ आणि अफाट इच्छाशक्ती यामुळे पक्ष आणखी मोठा कसा होईल, यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. ते सक्रिय असताना प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखाची, वैयक्तिक अडचणींची तसेच पक्षकार्याची सातत्याने विचारपूस करीत असत. त्यांच्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांना हा आधार जाणवला नाही. पक्षातील घडामोडी आणि जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थिती कोणाकडे मांडावी, असा प्रश्नही कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला होता. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासनाने सप्ताहभर विविध कार्यक्रम जाहीर केले आहेत. मात्र या कार्यक्रमांना अपेक्षित गती मिळताना दिसत नाही. विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे चित्र निश्चितच वेगळे राहिले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज त्यांच्याकडे कोणते पद असो अथवा नसो, पक्षासाठी काम करण्याची त्यांची धडपड कायम आहे. त्यांनी कार्यकर्त्यांची पारख करून योग्य व्यक्तींना पदांची जबाबदारी देत पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
विजय चौधरी यांच्या एका हाकेला जिल्हाभरातून एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणे, हीच त्यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची खरी पावती आहे. ते पुन्हा सक्रिय झाल्याने आम्हालाही आणि कार्यकर्त्यांनाही नवी स्फूर्ती मिळाली आहे. यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखालीच पक्षाचे काम करू, असा विश्वास आमदार पाडवी यांनी व्यक्त केला.
मेळाव्यात उपस्थित अन्य कार्यकर्त्यांनीही विजय चौधरी यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. विजय चौधरी यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ आणि त्यांची जाणवलेली उणीव याबाबत मनोगत व्यक्त केले. आता विजय चौधरी पुन्हा सक्रिय झाल्याने कार्यकर्ते नव्या उत्साहाने आणि जोमाने पक्षकार्यात सहभागी होतील, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.



