*भाजपच्या दिवाळी स्नेहमेळाव्यात विजय चौधरी यांची ग्वाही, पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भाजपच्या दिवाळी स्नेहमेळाव्यात विजय चौधरी यांची ग्वाही, पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन*
*भाजपच्या दिवाळी स्नेहमेळाव्यात विजय चौधरी यांची ग्वाही, पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांच्या आयुष्यात सुख असो अथवा दुःख, त्यांच्यावर कोणतेही संकट आले तरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजयभाऊ चौधरी यांनी दिली. विजय पर्व येथे आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
दिवाळीनिमित्त आयोजित या स्नेहमेळाव्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शहादा- तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, भाजप महिला जिल्हाध्यक्ष डॉ. समिधा नटावदकर, शहाद्याचे मकरंद पाटील, शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्यासह जिल्हाभरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय चौधरी यांनी देशातील व राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. देशात काही मंडळींकडून अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातही अशाच प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला, तरी सक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात व राज्याचा कारभार सुरळीत सुरू आहे. जनहिताला प्राधान्य देत सरकार विविध विकासकामे राबवीत आहे. शासनाच्या माध्यमातून देश व राज्य पातळीवर होत असलेली विकासकामे आणि लोक कल्याणकारी योजनांची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.



