*नरसीत महर्षी वाल्मिकी ऋषी व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नरसीत महर्षी वाल्मिकी ऋषी व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी*
*नरसीत महर्षी वाल्मिकी ऋषी व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी*
नरसी(प्रतिनिधी):-आद्यकवी तथा रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी ऋषी आणि महान आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती नरसी ता. नायगाव जि. नांदेड येथे आज रविवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह भजन, कीर्तन, आदिवासी पारंपरिक नृत्य आणि भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून दोन्ही महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.
जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बिलोली येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष उत्तरवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे नेते श्रावण भिलवंडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे भास्करराव भिलवंडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे रवींद्र भिलवंडे, वैजनाथ लोहगावे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या महान साहित्यिक योगदानाचे तसेच भगवान श्रीराम यांच्या जीवन चरित्रावर आधारित रामायणाच्या माध्यमातून समाजाला दिलेल्या संस्कारांचे महत्त्व सांगताना आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणारे महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या शौर्य, त्याग आणि संघर्षमय जीवनकार्याला उजाळा दिला.
प्रारंभी भजन- कीर्तनाच्या स्वरांनी परिसर भक्तिमय झाला होता, तर आदिवासी पारंपरिक नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उत्साहपूर्ण मिरवणुकीमुळे संपूर्ण नरसी परिसरात जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. या सोहळ्याचे सुत्रसंचलन साईनाथ तुरटवाड यांनी केले. यावेळी रामकिशन महाराज, गंगाधर वडगावे, कैलास पाचाळ, मारोती बट्टेवाड, सुभाष चुट्टेवाड, आनंदा गिरी, गंगाधर गंगासागरे, कैलास तेलंग, गोविंद टोकलवाड, मारोती सुर्यवंशी यांच्यासह नागरिक, युवक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापुरुषांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा संयुक्त जयंती सोहळा नरसीकरांसाठी उत्साहाचे पर्व ठरला.



