*काल,आज आणि उद्याही भाजपचे नेतृत्व विजय चौधरी यांच्याकडेच निलेश माळी यांचे प्रतिपादन, कार्यकर्त्यांसाठी विजय चौधरी प्रेरणास्थान असल्याचे गौरवोद्गार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*काल,आज आणि उद्याही भाजपचे नेतृत्व विजय चौधरी यांच्याकडेच निलेश माळी यांचे प्रतिपादन, कार्यकर्त्यांसाठी विजय चौधरी प्रेरणास्थान असल्याचे गौरवोद्गार*
*काल,आज आणि उद्याही भाजपचे नेतृत्व विजय चौधरी यांच्याकडेच निलेश माळी यांचे प्रतिपादन, कार्यकर्त्यांसाठी विजय चौधरी प्रेरणास्थान असल्याचे गौरवोद्गार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी विजय चौधरी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. विजय चौधरी हे कुशल संघटक असून वैयक्तिक कामापेक्षा पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या हिताला ते नेहमीच प्राधान्य देतात. आजचा कार्यक्रम स्नेहमेळाव्याचा असला, तरी त्याला पक्षीय संघटनात्मक जोड देण्यात आली आहे. आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम आणि संघटनात्मक नियोजन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा यामागील उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.
विजय चौधरी यांच्या रक्ताच्या कणाकणात पक्षकार्य भिनले आहे. मागील काही महिन्यांत त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे ते काही काळ पक्षकार्यातून अलिप्त राहिले. मात्र या काळात प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्यांच्या कार्याची आणि धडाडीची आठवण कायम होती. विजय चौधरी हे केवळ पक्षाचे नेतृत्व नाही, तर कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा आणि स्फूर्तीचे स्रोत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांना मोठी उणीव जाणवली. स्थानिक पातळीपासून राज्यस्तरावरील बैठकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांची आठवण होत होती. यावरून पक्षासाठी त्यांनी केलेल्या कामाचे महत्त्व लक्षात येते. विजय चौधरी यांना जेवढा वेळ मिळतो, तेवढ्या वेळात ते पूर्ण ताकदीने कामाला लागतात. आता पुन्हा ते त्याच जोमाने पक्षकार्यात सक्रिय होतील आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास व्यक्त करत भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व काल, आज आणि उद्याही विजय चौधरी यांच्याकडेच राहील. त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करीत आहोत आणि यापुढेही करणार आहोत, असे निलेश माळी यांनी स्पष्ट केले.



