*तातापाणी पिंपळसोंड उंबरपाडा येथे आदिवासी बांधवांसोबत पाड्यावरची दिवाळी करीता टांझानियाच्या परदेशी पाहुणी विनी पॅटरीकला बोहाडा सोंगी मुखवट्याची भुरळ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तातापाणी पिंपळसोंड उंबरपाडा येथे आदिवासी बांधवांसोबत पाड्यावरची दिवाळी करीता टांझानियाच्या परदेशी पाहुणी विनी पॅटरीकला बोहाडा सोंगी मुखवट्याची भुरळ*
*तातापाणी पिंपळसोंड उंबरपाडा येथे आदिवासी बांधवांसोबत पाड्यावरची दिवाळी करीता टांझानियाच्या परदेशी पाहुणी विनी पॅटरीकला बोहाडा सोंगी मुखवट्याची भुरळ*
सुरगाणा(प्रतिनिधी):-आदिवासी संस्कृती जाणून घेत माहिती घेतली. रोटरॅक्ट कल्ब ऑफ नाशिक ग्रेप व्हॅली यांच्या वतीने तालुक्यातील तातापाणी पिंपळसोंड उंबरपाडा येथे गरजू शेतमजूर आदिवासी बांधवांसोबत पाड्यावरची दिवाळी टांझानियाच्या परदेशी पाहुणी विनी पॅटरीक सहभागी झाल्या होत्या.पाड्यावरची दिवाळी
उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी क्लबच्या सदस्यांचे आदिवासी बांधवांनी संबळ कहाळी,ढोल,पावरी नृत्य सोबतच सोंगी मुखवटे आदिवासी कला संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. तातापाणी पिंपळसोंड उंबरपाडा येथे पाणी टंचाई परिस्थिती निवारण करण्यासाठी गावात सिंगल फेज मोटार व पाईप भेट देणार असल्याचे कल्बचे सदस्य आशिष निकम यांनी जाहीर केले. पाड्यावर
पारंपरिक पद्धतीने प्रत्येक घरात दिव्यांची आरास करण्यात आली होती.पाड्यावरच्या नागरिकांसोबत सामूहिक स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. पाहुण्यांनी यावेळी सोबतच
आदिवासी समाजात सण- उत्सवांना केवळ धार्मिक महत्त्व नसून त्यातून निसर्गाशी असलेले नाते, पूर्वजांच्या परंपरा आणि सामाजिक एकोपा कसा जपला जातो. दिवाळीच्या निमित्ताने घरांची स्वच्छता, परिसराची सजावट, दिव्यांची रोषणाई
आणि पारंपरिक पद्धतीने पूजाविधी कसे करतात याविषयी जाणून आदिवासी संस्कृती सणांचे महत्त्व समजून घेतले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उत्सवात सहभाग घेतला. पारंपरिक खाद्यसंस्कृती, आपुलकीच्या भेटीगाठी आणि आनंदी वातावरणामुळे पाड्यावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बदलत्या काळातही आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश या उत्सवातून देण्यात आला.
आदिवासी संस्कृतीतील प्रत्येक सणामागे निसर्ग, शेती, पशुधन, ग्रामदेवता आणि पूर्वजांच्या स्मृती यांच्याशी जोडलेली परंपरा आहे. उंबरपाडा तातापाणी येथील दिवाळी उत्सवाने या सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित केले. यामध्ये क्लबचे अध्यक्ष अंगद चढ्ढा, उपाध्यक्ष आशिष निकम, राहुल पानसरे, हितवेशा पडाया, भक्ती परदेशी, प्रकाश अग्रवाल, रश्मी अग्रवाल, तन्मय धामणे, सुरज गोसावी, अविष्कार भागवत, कृशल चौधरी, बुरहान ढोलकवाला, टांझानियाच्या परदेशी पाहुणी विनी पॅटरीक,
शिवम बनकर आदी सदस्य पाड्यावरची दिवाळी सोहळ्यात सहभागी झाले होते. ग्रामस्थ माजी सैनिक शिवराम चौधरी, गोविंद देशमुख, रतिलाल चौधरी, रंगू चौधरी, साकरुबाई चौधरी, कमलेश चौधरी आदी सहभागी झाले होते.



