*चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद! सेवाभावे प्रतिष्ठान तळोदातर्फे धनपूर येथे दिवाळी आनंदोत्सव उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद! सेवाभावे प्रतिष्ठान तळोदातर्फे धनपूर येथे दिवाळी आनंदोत्सव उत्साहात साजरा*
*चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद! सेवाभावे प्रतिष्ठान तळोदातर्फे धनपूर येथे दिवाळी आनंदोत्सव उत्साहात साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-दरवर्षीप्रमाणे यंदाही सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा यांच्या वतीने सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धनपूर या गावात बाल गोपालांसोबत दिवाळी आनंदोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी लहान बाल गोपालांसोबत आनंदाचे क्षण घालवत त्यांना नाश्ता, फराळ व गोडधोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या कार्यक्रमाला सेवाभावे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संतोष जगत चौधरी, संचालक शिरीष मगरे, सल्लागार विजयराव सोनवणे व मोहन रघुवंशी व
तसेच कपिल प्रताप धनका, शैलेश रामदास धनका, अरविंद गुलाब, जयऱ्या धनका यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.



