*जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहांतर्गत महिला बचत गटांना अर्थसहाय्यासाठी कागदपत्रांची पूर्तता, नवापूर येथील लाभ वितरण मेळाव्याला महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहांतर्गत महिला बचत गटांना अर्थसहाय्यासाठी कागदपत्रांची पूर्तता, नवापूर येथील लाभ वितरण मेळाव्याला महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहांतर्गत महिला बचत गटांना अर्थसहाय्यासाठी कागदपत्रांची पूर्तता, नवापूर येथील लाभ वितरण मेळाव्याला महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 11 ते 18 नोव्हेंबर 2026 या कालावधीत 'जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह-2026' साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत 13 नोव्हेंबर रोजी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नवापूर येथे लाभ वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे धनादेश वितरित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेणे, तसेच आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. आदिवासी विकास विभाग आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जुलै ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत नवापूर येथे 100 टक्के आदिवासी महिलांचा सहभाग असलेले महिला बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. या बचत गटांमधील सुमारे 80 ते 85 महिला सदस्यांसह इतर ग्रामस्थांनीही मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या महिला बचत गटांना आदिवासी विकास विभागाच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत 'राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजने'च्या माध्यमातून प्रत्येकी 10 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या अर्थसहाय्याचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता मेळाव्यात करून घेण्यात आली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी तसेच तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार उपस्थित होते. त्यांनी उपस्थित महिला व ग्रामस्थांना आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना आणि पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शासकीय सुविधांची सविस्तर माहिती दिली. 'जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह-2026' अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण, जनजागृती तसेच विकासाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात येत आहे.



