*जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहानिमित्त चांदसैली येथे सात महिला बचत गटांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर,मेळाव्यात लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहानिमित्त चांदसैली येथे सात महिला बचत गटांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर,मेळाव्यात लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता*
*जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहानिमित्त चांदसैली येथे सात महिला बचत गटांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर,मेळाव्यात लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह-2026’ अंतर्गत शहादा तालुक्यातील चांदसैली येथे लाभ वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सात महिला बचत गटांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 11 ते 18 नोव्हेंबर 2026 या कालावधीत जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत 13 नोव्हेंबर रोजी चांदसैली ग्रामपंचायतीत आयोजित मेळाव्यात न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांकडून धनादेश वितरणासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. तसेच आदिवासी विकास विभागाच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनांसह विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
आदिवासी विकास विभाग आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त प्रयत्नातून 1 जुलै ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत चांदसैली गावातील आदिवासी महिलांच्या 100 टक्के सहभागातून सात महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. या बचत गटांना आदिवासी विकास विभागाच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्पांतर्गत राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या अनुषंगाने मेळाव्यात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. या मेळाव्यास बचत गटांमधील सुमारे 70 महिला तसेच इतर पुरुष उपस्थित होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी आणि तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांनी उपस्थितांना आदिवासी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेची सविस्तर माहिती दिली.
‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह-2026’ अंतर्गत जिल्ह्यात विविध लाभांचे वितरण आणि जनहिताचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.



