*किल्ला बांधणी स्पर्धेत पाचल दिवाळवाडीच्या चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*किल्ला बांधणी स्पर्धेत पाचल दिवाळवाडीच्या चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
*किल्ला बांधणी स्पर्धेत पाचल दिवाळवाडीच्या चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे पाचल दिवाळवाडीत श्री स्वामी नृसिंहसरस्वती प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्ताने किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी म्हटली की किल्ला आलाच. आपला गौरवशाली इतिहास, शिवरायांचा पराक्रम लहान मुलांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाचल दिवाळवाडीतील मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. मुलांनी आपल्या कल्पकतेने, मेहनतीने सुंदर असे किल्ले साकारले होते. ज्या मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला, त्या सर्व मुलांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. सर्व सहभागी मुलांना योग्य असे बक्षीस श्री स्वामी नृसिंहसरस्वती प्रतिष्ठानचे संस्थापक संजीव शिवाजी सुतार यांच्या तर्फे देण्यात आले.



