*मुंबईत 24 नोव्हेंबरला बुवाबाजीविरोधी राज्यस्तरीय महिला परिषद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुंबईत 24 नोव्हेंबरला बुवाबाजीविरोधी राज्यस्तरीय महिला परिषद*
*मुंबईत 24 नोव्हेंबरला बुवाबाजीविरोधी राज्यस्तरीय महिला परिषद*
मुंबई(प्रतिनिधी):-यशवंतराव चव्हाण सेंटर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 24 नोव्हेंबर 2024 रोजी मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे बुवाबाजीविरोधी राज्यस्तरीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवात सकाळी 9.30 वाजता नोंदणी, चहा नाश्ता व प्रबोधनाच्या गाण्यांनी होणार असून 11 ते 12.30 या वेळेत होणाऱ्या पहिल्या सत्राचे उद्घाटन खा. सुप्रिया सुळे (कार्याध्यक्ष - यशवंतराव चव्हाण सेंटर) यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सोनाली कुलकर्णी,अनिता दाते (सुप्रसिद्ध अभिनेत्री) उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय बनसोडे (राज्य कार्याध्यक्ष महा.अंनिस) हे भुषविणार आहेत.
दुसरेसत्र दु.12.30 ते 1.30 या वेळेत होणार असून मा. डाॅ अनिल डोंगरे (ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, अलिबाग) बुवाबाजी:बळी स्त्रियांचा,एक मानसशास्त्रीय विश्लेषण या विषयावर संबोधित करणार आहेत, दु. 2.30 ते 3. 30 यामध्ये होणाऱ्या तिसऱ्या सत्रात जेन-झी टाॅक ऑन बुवाबाजी या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात प्रियांका खेडेकर, हरी आवळे, शीतल वसावे, गौरी जाधव सहभागी होणार आहेत चौथ्या समारोपाच्या सत्रात दु.3.30 ते सायं 7 या वेळेत मा. प्रा.नीरजा (ज्येष्ठ साहित्यिका) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहुन मार्गदर्शन करतील. या परिषदेत कांही ठराव ही मंजूर केले जातील. माधव बावगे (राज्य अध्यक्ष, महा.अंनिस) यांच्या अध्यक्षतेखाली या दिवसभराच्या परिषदेचा समारोप 'हम होंगे कामयाब' या गीताने होईल.
राज्यभरातील महिलां तातून तारिनी व कार्यकर्त्यांनी आपला नोंदणी फाॅर्म भरण्यासाठी 9004282663, 9869077462 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा आणि नोंदणी करुं मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



