*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी सामाजिक संस्था पुणे व पिपरी चिंचवडतर्फे समाजातील दुःखी समाजबांधवाना दिवाळी निमित्त फराळ वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी सामाजिक संस्था पुणे व पिपरी चिंचवडतर्फे समाजातील दुःखी समाजबांधवाना दिवाळी निमित्त फराळ वाटप*
*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी सामाजिक संस्था पुणे व पिपरी चिंचवडतर्फे समाजातील दुःखी समाजबांधवाना दिवाळी निमित्त फराळ वाटप*
पुणे(प्रतिनिधी):-समाजातील एखाद्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यास त्या कुटुंबात साधारणपणे एक वर्ष तरी कोणताही सण साजरा केला जात नाही. अश्यावेळी आपल्या समाजातील दुःखी बांधवाची दिवाळी गोड व्हावी असा मानस पदाधिकाऱ्यानी केला होता.आणि त्यानुसार ज्या समाजबांधवांच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले आहे, अश्या समाजबांधवांना दिवाळी निमित्ताने फराळाचे वाटप करण्याचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी सर्वानुमते ठरविले आणि त्याप्रमाणे समाजातील
एकूण 70 कुटुंबांना आपल्या संस्थेच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने फराळाचे वाटप करण्यात आला. त्याकरिता संस्थेच्या सर्व पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, सभासद व संपर्क प्रमुख यांनी खूप मेहनत घेतली. अगदी मयत सदस्यांची विभागवारप्रमाणे यादी करणे, तसेच फराळ वाटपाची जबाबदारी प्रत्येकानी घेऊन वाटप वेळेत पूर्ण केले. सदर उपक्रम यशस्वी करण्यात अध्यक्ष यश राजेश शिंदे, उपाध्यक्ष नितीन बाळा मोरे, संतोष दिनकरराव भोसले, सचिव संदीप तुकाराम चव्हाण, कार्याध्यक्ष राजन शिवाजी जाधव, व पदाधिकारी रोहित दिगंबर मोरे, महेश दत्तात्रेय जाधव, मनीष सहदेव चव्हाण, महिंद्र मुकुंद जाधव, किशोर काशीराम हळदे, प्रविण बाळकृष्ण कदम, सतीश मधुकर मोरे, सागर संतोष निकम व सर्व सभासदानी मेहनत घेतली. सदर उपक्रमाची दखल समाजातील जेष्ठ समाज बांधव, तसेच ईतर समाज बांधव यांनी घेऊन सर्व स्तरातून या उपक्रमाची स्तुती करण्यात येत आहे आणि असेच समाजोपयोगी कामे करत रहावे असे सर्वाना सूचित पण करण्यात आले आहे.



