*सातपुड्यात बिरसा मुंडांच्या जयजयकाराने दुमदुमला परिसर, ओढी येथे भव्य वैचारिक प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न, प्रेमकुमार गेडाम यांची विशेष उपस्थिती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सातपुड्यात बिरसा मुंडांच्या जयजयकाराने दुमदुमला परिसर, ओढी येथे भव्य वैचारिक प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न, प्रेमकुमार गेडाम यांची विशेष उपस्थिती*
*सातपुड्यात बिरसा मुंडांच्या जयजयकाराने दुमदुमला परिसर, ओढी येथे भव्य वैचारिक प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न, प्रेमकुमार गेडाम यांची विशेष उपस्थिती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जननायक धरतीआबा क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ओढी येथे 13 नोव्हेंबर रोजी भव्य वैचारिक प्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद, भारताचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रेमकुमार गेडाम यांची विशेष उपस्थिती लाभली.
समस्त आदिवासी समाज व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांचा ऐतिहासिक क्रांतिकारी लढा, आदिवासींचे जल-जंगल-जमीनवरील हक्क, भारतीय संविधान, संविधानिक अधिकार, आदिवासी अस्मिता, स्वाभिमान आणि वर्तमान परिस्थिती या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. रवी पाडवी (ओघाणी) होते, तर उद्घाटक म्हणून नानसिंग दादा वसावे (पोलीस पाटील, ओढी) उपस्थित होते. विविध मान्यवर व वक्त्यांनी आपल्या विचारांतून आदिवासी समाजाला शिक्षण, संघटन, हक्कांची जाणीव आणि संविधानिक मार्गाने संघर्ष करण्याचा संदेश दिला. सातपुड्याच्या भूमीत भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा जयघोष करत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक, माता-भगिनी आणि ग्रामस्थांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.



