*जनजातीय गौरव दिनानिमित्त नंदुरबार प्रकल्पांतर्गत 353 आदिवासी गाव पाड्यांमध्ये स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता,आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जनजातीय गौरव दिनानिमित्त नंदुरबार प्रकल्पांतर्गत 353 आदिवासी गाव पाड्यांमध्ये स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता,आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*जनजातीय गौरव दिनानिमित्त नंदुरबार प्रकल्पांतर्गत 353 आदिवासी गाव पाड्यांमध्ये स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता,आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तसेच जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून आदि कर्मयोगी अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत 14 नोव्हेंबर रोजी आदि कर्मयोगी स्वयंसेवकांच्या पुढाकारातून नंदुरबार प्रकल्पांतर्गत नंदुरबार, नवापूर आणि शहादा या तीन तालुक्यांतील एकूण 353 आदिवासी गाव-पाड्यांमध्ये विशेष स्वच्छता व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गावातील आदिवासी महापुरुषांची स्मारके, पुतळे, देवी-देवता, समाजमंदिरे तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत आदि कर्मयोगी स्वयंसेवकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला.
आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि नव्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख व्हावी, या उद्देशाने आदिवासी देव-देवतांच्या पूजापद्धती, पारंपरिक श्रद्धा, रूढी-परंपरा, सामाजिक अस्मिता आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रमही आदि कर्मयोगी स्वयंसेवकांमार्फत आयोजित करण्यात आले.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेला स्वाभिमान, संघर्ष आणि सांस्कृतिक अस्मितेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, आदिवासी महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करणे, ऐतिहासिक वारशाचे जतन करणे तसेच गावपातळीवर स्वच्छता आणि सामाजिक सहभागाची भावना वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आदि कर्मयोगी स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावपातळीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आदिवासी समाजातील सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होण्यास तसेच पारंपरिक वारसा जतन करण्यासाठी सामूहिक सहभागाला प्रोत्साहन मिळाले.



