*डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते प्रकाशा-भादे पुलाचे लोकार्पण आणि धुरखेडा येथील समाज मंदिराचे भूमिपूजन, ग्रामविकास हाच आमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू, डॉक्टर सुप्रिया यांनी भाषणातून दिलà¥
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते प्रकाशा-भादे पुलाचे लोकार्पण आणि धुरखेडा येथील समाज मंदिराचे भूमिपूजन, ग्रामविकास हाच आमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू, डॉक्टर सुप्रिया यांनी भाषणातून दिलà¥
*डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते प्रकाशा-भादे पुलाचे लोकार्पण आणि धुरखेडा येथील समाज मंदिराचे भूमिपूजन, ग्रामविकास हाच आमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू, डॉक्टर सुप्रिया यांनी भाषणातून दिली ग्वाही*
नंदुरबार(प्रतिनिधी):-माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी मंजूरी मिळवून दिलेल्या शहादा तालुक्यातील विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन माजी खासदार डॉ.हिना गावित व जिल्हा परिषद माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
यात शहादा तालुक्यातील प्रकाशा-धूरखेडा-भादे येथील लहान पूल व रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंजुरी मिळवून दिलेल्या धुरखेडा येथील समाज मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद माजी सभापती सौ. हेमलता शितोळे पाटील, गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते. दरम्यान याप्रसंगी ग्रामस्थांना उद्देशून केलेल्या भाषणात संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की, माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी त्यांच्या कार्यामध्ये कायमच ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले. प्रत्येक गावाचा विकास व्हावा या दृष्टीने, माझ्या खासदारकीच्या काळात देखील सदैव प्राधान्य देऊन अनेक गावांना विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणता आले. यापुढेही गावांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल असे डॉक्टर हिना म्हणाल्या. डॉक्टर सुप्रिया यांनी देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण पाणी वीज रस्ते याबरोबरच अन्य विकास कामांना महत्व दिले. ग्रामीण लोकांचे जीवन सहज सोपे करण्यासाठी ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण व ग्रामविकास हाच आमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असल्याचे सुप्रिया गावित म्हणाल्या.



