*चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांच्याहस्ते बियाणे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांच्याहस्ते बियाणे वाटप*
*चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांच्याहस्ते बियाणे वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दुष्काळी परिस्थितीमध्ये पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांच्या हस्ते पशुसंवर्धन विभागामार्फत 100% अनुदानावर 15 पशुपालक शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी प्रत्येकी 10 किलो मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी तुषार गीते, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण दशरथ माळी, दिनेश साहेबराव माळी तसेच अनेक पशुपालक व शेतकरी उपस्थित होते. संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून गुरांच्या चाऱ्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. त्या अंतर्गत चारा लागवडीसाठी बियाणे वाटप देखील सुरू केले आहे.



