*पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जिवेठार मारणाऱ्या आरोपी पतीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेप शिक्षा व रु. 13 हजारांचा दंड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जिवेठार मारणाऱ्या आरोपी पतीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेप शिक्षा व रु. 13 हजारांचा दंड*
*पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जिवेठार मारणाऱ्या आरोपी पतीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेप शिक्षा व रु. 13 हजारांचा दंड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा पोलीस ठाण्याचे हद्दीतील फिर्यादी नामे जतनबाई भ्र. दंगल माळी वय 68, रा. ब्राम्हणपुरी ता. शहादा, जि. नंदुरबार यांची मुलगी राधाबाई हिचा विवाह गोदीपूर ता. शहादा येथील विलास अंबर ठाकरे यांच्या सोबत झाला होता. विलास ठाकरे व राधाबाई यांच्या चार मुली पैकी एक मुलगी तिची आजी फिर्यादी जतनबाई भ्र. दंगल माळी यांच्या कडे वास्तव्यास होती. विलास ठाकरे व राधाबाई असे दोघेही मजुरीचे कामे करत कुटुंबाचा उदर निर्वाह करीत होते. विलास अंबर ठाकरे यास दारुचे व्यसन असल्याने तो आलेल्या पैश्यातून नेहमी दारु पित असे. काही वेळेस विलासकडे दारु पिण्याकरीता पैसे नसल्याने तो पत्नी राधाबाई हिच्याकडेस दारु पिण्याकरीता पैसे मागत असे. त्यामुळे विलास व राधाबाई यांचेत वादविवाद होत असत. राधाबाईने पती विलास ठाकरे यास पैसे दिले नाहीतर तो राधाबाईच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करीत असे. त्यामुळे सदर बाब राधाबाईने तिची फिर्यादी आई जतनबाई माळी यांना देखील सांगितलेली होती.
27 ऑगस्ट 2018 रोजी फिर्यादी जतनबाई माळी त्यांचा मुलगा दिपकसह घरी असतांना विजय अंबर ठाकरे हा सकाळी 6 वाजेच्या वेळी त्यांचे घरी ब्राम्हणपुरी येथे येत निरोप दिला की, "तुमचा जावाई विलास अंबर ठाकरे याने त्याच्या राहते घरी राधाबाई हिस लोखंडी भाल्याने मारले आहे व ती जखमी अवस्थेत घरात पडलेली आहे." फिर्यादी जतनबाई व त्यांचा मुलगा दिपक यांनी विजय ठाकरे यांचा निरोप ऐकून विलंब न करता गोदीपुर येथील राधाबाईचे घरी गेले असता तेव्हा राधाबाई घरात जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसली होती व तिच्या शरीरावर अनेक जखमा देखील दिसत होत्या, राधाबाई हिच्या शरीराची हालचाल पुर्णपणे बंद होवून ती मयत झाल्याची खात्री फिर्यादी जतनबाई व दिपक यांना झाली होती. तसेच राधाबाईच्या प्रेताशेजारी तिच्या तिनही मुली रडत बसलेल्या होत्या. लहान मुलगी सविता हिच्या उजव्या गालावर जखम झालेली होती व त्यातून रक्त देखील निघत होते. तेव्हा फिर्यादी जतनबाई यांनी सविता हिची जखमेबाबत चौकशी केली असता तेव्हा सविता हिने सांगितले की, "पहाटेच्या सुमारास दादाने माझ्या आईला भाल्याने मारहाण केली व मला पण गालावर भाल्याने मारले आहे, तेव्हा फिर्यादी राधाबाई व दिपक यांनी नातेवाईकां मार्फतीने पोलीसांसोबत संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली होती. त्यावरुन शहादा पोलीस स्टेशन येथे आरोपी विलास अंबर ठाकरे विरुध्द गु.र.नं. 291/2018, भा.द.वि. कलम 302,324, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास शहादा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दिपक बागुल यांनी केला असून आरोपी विलास अंबर ठाकरे, वय 40, रा. गोदीपुर ता. शहादा जि. नंदुरबार यास तात्काळ अटक करत अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने सदर गुन्हयाचा तपास करुन महत्वाचे पुरावे
जमा केले होते व आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र अति. जिल्हा सत्र न्यायालय, शहादा येथे सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. सत्र न्यायाधीश 1, शहादा अ. वि. गुजराथी यांच्या समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, डॉक्टर साक्षीदार, तपास अधिकारी तसेच पिडीतेच्या मुली यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे पिडीतेचा पती आरोपी विलास अंबर ठाकरे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश 1, शहादा यांनी भा. द.वि.क. 302, 324 अन्वये दोषी ठरवत जन्मठेप व एकुण 13,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. स्वर्णसिंह गिरासे यांनी पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि योगिता राठोड, पोउपनि/विनोद पाटील, शहादा पोलीस ठाणे तसेच पैरवी अंमलदार पो.हे. कॉ. गणेश सावळे, पो.कॉ. देविदास सुर्यवंशी, पो.हे. कॉ.प्रविण पटेल, पो.हे.कॉ शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा गुलाबराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.



