*आ. चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला यश, नंदुरबारला ‘प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र’ मंजूर, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मिळणार मोफत सहाय्यकारी साहित्य*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आ. चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला यश, नंदुरबारला ‘प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र’ मंजूर, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मिळणार मोफत सहाय्यकारी साहित्य*
*आ. चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला यश, नंदुरबारला ‘प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र’ मंजूर, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मिळणार मोफत सहाय्यकारी साहित्य*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेनेचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, केंद्र सरकारकडून नंदुरबार येथे ‘प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रा’ला मंजुरी मिळाली आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या आरोग्य तपासणीसह आवश्यक सहाय्यकारी उपकरणे मोफत उपलब्ध होणार आहेत. हे केंद्र जयप्रकाश नारायण रुग्णालयात सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार सहाय्यकारी साहित्य उपलब्ध करून दिले जाते. नंदुरबार येथे या केंद्राला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना आता आवश्यक उपकरणांसाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज कमी होणार आहे.
आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पुढाकारातून मागील दीड वर्षात राष्ट्रीय वयोश्री योजना, एलिम्को आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी 8 ते 10 शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांद्वारे सुमारे 5 हजार लाभार्थ्यांना तब्बल 5 कोटी रुपयांच्या सहाय्यकारी साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय, सीएसआरच्या माध्यमातूनही गरजूंना साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते.
दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य व सामाजिक कल्याण क्षेत्रात महत्त्वाची भर पडली आहे. 800 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी,शनिवारी यशवंत विद्यालयाच्या मैदानात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना सहाय्यक उपकरण मिळावेत यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन राष्ट्रीय वयोश्री योजना, एलिम्को आणि आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते.दिवसभरातून 800 जणांची तपासणी झाली.यावेळी आ. चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक कुणाल वसावे, बाजार समिती सभापती ठाणसिंग गिरासे, जि.प माजी सदस्य देवमन पवार, सभापती कैलास पाटील, संचालक किशोर पाटील, नगरसेविका सोनिया राजपूत, नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक पप्पू गिरासे, प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी, एलिम्कोचे डॉ. किरण पावरा आदी उपस्थित होते. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना आर्थिक अडचणींमुळे आवश्यक सहाय्यकारी उपकरणे मिळवणे कठीण जाते. अशा परिस्थितीत दिव्याशा केंद्र सुरू झाल्याने गरजू लाभार्थ्यांना मोफत सहाय्यकारी साहित्य मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत मिळेल.



