*ओणी पंचक्रोशीत बालकुमार साहित्य संमेलन व डॉ. आंबेडकर विचार व्याख्यानमालेचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओणी पंचक्रोशीत बालकुमार साहित्य संमेलन व डॉ. आंबेडकर विचार व्याख्यानमालेचे आयोजन*
*ओणी पंचक्रोशीत बालकुमार साहित्य संमेलन व डॉ. आंबेडकर विचार व्याख्यानमालेचे आयोजन*
राजापूर(प्रतिनिधी):-ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ओणी आणि को. म. सा. प. शाखा, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ओणी येथे भव्य साहित्यिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी येथे ओणी पंचक्रोशी बालकुमार साहित्य संमेलन 23 नोव्हेंबर 2026 रोजी, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व्याख्यानमाला 25 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजीचा कार्यक्रम असा - सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत सुप्रभा वाचनालय, कोंडिवळे ते नूतन विद्यामंदिर, ओणी अशी पुस्तक दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत उद्घाटन समारंभ होईल. उद्घाटक म्हणून जि. प. रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे हे असतील. संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी, कणकवलीचे अजय कांडर भूषवतील. स्वागताध्यक्ष को. म. सा. प. शाखा राजापूरचे अध्यक्ष मा. वासुदेव तुळसणकर असतील. प्रमुख उपस्थिती म्हणून को. म. सा. प. च्या अध्यक्षा सौ. नमिता कीर असतील. सूत्रसंचालन प्रा. विकास पाटील करतील. दुपारी 12 ते 1- लेखक आपल्या भेटीला, यात बालसाहित्यिक मा. मदन हजेरी यांची मुलाखत प्राचार्य डॉ. राजाराम राठोड व सौ. सुधा कुळ्ये घेतील.
दुपारी 1 ते 2 - मध्यंतर
दुपारी 2 ते 2.45 - निवडक 15 शालेय मुलांचे कविसंमेलन, निवेदक - मा. प्रज्ञेश देवस्थळी
दुपारी 2.45 ते 3.30 प्रसिद्ध कवितांचे गायन दहा संघांना संधी, निवेदक समिर देशपांडे
सायंकाळी 3.30 ते 4.15 समारोप भाषण, संमेलनाध्यक्ष अजय कांडर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व्याख्यानमाला
पहिले पुष्प 25 नोव्हेंबर, सकाळी 11 ते 12.30
विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीमुक्तीसाठीचे कार्य वक्त्या प्रमिता तांबे कवयित्री, कणकवली, दुसरे पुष्प 26 नोव्हेंबर, सकाळी 11 ते 12.30 विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना वक्ते अजय कांडर, सुप्रसिद्ध कवी कणकवली
तिसरे पुष्प 27 नोव्हेंबर, सकाळी 11 ते 12.30
विषय मराठी कवितेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन
वक्ते डॉ. शिवराज गोपाळे रत्नागिरी, चौथे पुष्प 28 नोव्हेंबर, सकाळी 9 ते 10.30 विषय संविधानाचे महत्त्व
वक्ते राष्ट्रपाल सांवत चिपळूण या दोन्ही कार्यक्रमांसाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे सचिव ॲड. गुरुदत्त शहाजी खानविलकर, कार्याध्यक्ष प्रदीप धोंडू संसारे, कार्यवाह विनोद गंगाराम मिरगुले, शाळा समिती अध्यक्ष सूर्यकांत सुतार आणि मुख्याध्यापिका सौ. साक्षी संतोष शिंदे यांनी केले आहे.



