*रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील आडीवरे येथे रस्ता रुंदीकरण वा पर्यायी मार्गाची गरज, पर्यटन, ऐतिहासिक वारसा आणि सुखकर प्रवासासाठी सुयोग्य नियोजनाची अपेक्षा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील आडीवरे येथे रस्ता रुंदीकरण वा पर्यायी मार्गाची गरज, पर्यटन, ऐतिहासिक वारसा आणि सुखकर प्रवासासाठी सुयोग्य नियोजनाची अपेक्षा*
*रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील आडीवरे येथे रस्ता रुंदीकरण वा पर्यायी मार्गाची गरज, पर्यटन, ऐतिहासिक वारसा आणि सुखकर प्रवासासाठी सुयोग्य नियोजनाची अपेक्षा*
राजापूर(प्रतिनिधी):-कोकण किनारपट्टीच्या सर्वांगीण विकासाची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक 4 'रेवस-रेड्डी सागरी महामार्गा'वर आडीवरे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत आणि विनाअडथळा करण्यासाठी रस्ता रुंदीकरण अथवा पर्यायी बाह्यवळण (बायपास) मार्ग तयार करण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून थेट सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या या सागरी महामार्गावर नैसर्गिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाचा प्रचंड ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील वाढती वाहतूक विचारात घेऊन आडीवरे येथे योग्य नियोजन झाल्यास लाखो भाविक, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचा प्रवास अत्यंत सुखकर व सुरक्षित होणार आहे. रेवस - रेड्डी हा केवळ एक मार्ग नसून कोकणातील अथांग समुद्र किनारे, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक गडदुर्गांना जोडणारा एक संपन्न पर्यटन कॉरिडॉर ठरत आहे. या महामार्गाच्या सानिध्यात रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध भाटे बीच, निसर्गरम्य गावखडीचा समुद्रकिनारा, राजापूर तालुक्यातील विस्तीर्ण कशेळी बीच आणि मनमोहक आंबोळगड बीच अशी एकापेक्षा एक नयनरम्य पर्यटनस्थळे वसलेली आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात दुर्मीळ असलेले कशेळी येथील प्रसिद्ध 'श्री कणकादित्य सूर्यमंदिर', रत्नागिरी तालुक्यातील पूज्य स्वामी स्वरूपा नंदांची पावनभूमी 'पावस' आणि राजापूर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले 'श्री महाकाली देवस्थान, आडीवरे' अशी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे थेट याच महामार्गावर येतात. याशिवाय ऐतिहासिक वारसा लाभलेला समुद्राच्या मुखाशी उभा असलेला किल्ले पूर्णगड, राजापूरमधील ऐतिहासिक किल्ले आंबोळगड आणि किल्ले यशवंतगड ही ऐतिहासिक ठिकाणेही या मार्गामुळे पर्यटकांच्या सहज टप्प्यात आली आहेत. अशा बहुपेडी पर्यटनामुळे या मार्गावर वर्षभर, विशेषतः सुट्ट्यांच्या हंगामात आणि नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत भाविक व पर्यटकांची अलोट गर्दी उसळते. आडीवरे येथील श्री महाकाली मंदिरातील नवरात्रोत्सवाच्या काळात तर वाहनांची संख्या प्रचंड वाढते. सध्या आडीवरे परिसरातील रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी वारंवार मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते, ज्याचा परिणाम लांब पल्ल्याच्या वाहनांवर आणि स्थानिक जनजीवनावर होतो. येथील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आडीवरे येथील रस्त्याचे रुंदीकरण करणे किंवा गावाला वळसा घालून जाणारा एक स्वतंत्र पर्यायी मार्ग निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. असा सक्षम मार्ग उपलब्ध झाल्यास सिंधुदुर्ग व गोव्याकडे जाणारी अवजड आणि वेगवान वाहने विनाअडथळा पुढे निघून जातील, ज्यामुळे आडीवरे बाजारपेठ आणि मंदिर परिसरावरील ताण पूर्णपणे हलका होईल. स्थानिक व्यापारी आणि पायी जाणाऱ्या भाविकांना सुरक्षित वावर मिळेल, प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचेल आणि कोकणातील सागरी व ऐतिहासिक पर्यटनाला आणखी मोठी गती मिळेल. प्रशासनाने या भौगोलिक आणि पर्यटनदृष्ट्या संवेदनशील परिसराचा विचार करून सकारात्मक पावले उचलावीत, जेणेकरून सागरी महामार्गावरील सर्वांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि जलद होईल, असा सूर सर्व स्तरांतून उमटत आहे.



