ताजा खबरे:
*खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मौजे जैतापूरने केली ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी*
*राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता, सुनिश्चित करण्यासाठी "मिशन मुरघास" मोहीम
*एम.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), नंदुरबारच्या आठ विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेसाठी निवड*
*एम.के.डी.स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड*
*ना पाठांतराची कटकट, ना नापासाची भीती; ‘उल्लास’अंतर्गत होणार परीक्षा, तीन तासांचा अवधी, दिव्यांगांना अतिरिक्त वेळ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता, सुनिश्चित करण्यासाठी "मिशन मुरघास" मोहीम

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता, सुनिश्चित करण्यासाठी "मिशन मुरघास" मोहीम

  • Share:

*राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता, सुनिश्चित करण्यासाठी "मिशन मुरघास" मोहीम* 
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यात सद्यस्थितीत 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभर "मिशन मुरघास" ही जनजागृती व कृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासामध्ये रूपांतर करून भविष्यातील चारा टंचाईवर मात करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिली आहे.
दुष्काळी परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास जनावरांच्या आरोग्यावर, दुग्धोत्पादनावर व पशुपालकांच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होतो. यावर उपाय म्हणून, सन 2026 -27 मध्ये खरीप हंगामात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैरण बियाणे वाटपासाठी 48.20 कोटी आणि विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पातंर्गत 3 कोटी, असा एकूण 51.20 कोटी निधी आधी उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच, सध्याच्या टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेतून 66.41 कोटी व विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत 10 कोटी, असा एकूण 76.41 कोटी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रावर चारा लागवड करून त्यापासून मुरघास निर्मिती करण्याचे नियोजन आहे. मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये व अंमलबजावणी,
पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान (एनएलएम), SMART (स्मार्ट) योजनेअंतर्गत मुरघास उत्पादक व विक्रेत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने चाऱ्याची कापणी, कुट्टी, दाबणी व हवाबंद साठवणुकीचे प्रशिक्षण दिले जाईल. दूध सहकारी संघ, सहकारी दूध संकलन संस्था, महिला बचत गट, ग्राम संघ, शेतकरी उत्पादक गट, कृषी विज्ञान केंद्र व ग्रामस्तरीय यंत्रणेच्या सहभागातून गावोगावी प्रात्यक्षिके आयोजित करून मुरघासाचे महत्त्व पटवून दिले जाईल. मका, ज्वारी, नेपिअर यांसारख्या कमी कालावधीत व कमी पाण्यात जादा उत्पादन देणाऱ्या चारा पिकांपासून मुरघास तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. विदर्भ- मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा क्र. 2 अंतर्गत 19 जिल्ह्यांसाठी विशेष 'मुरघास योजना '
विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमधील दूध उत्पादक शेतकरी व पशुपालकांसाठी उन्हाळ्यातील व दुष्काळी परिस्थितीतील वैरण टंचाईवर मात करण्यासाठी 'मागेल त्याला मुरघास' ही विशेष योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र पशुपालकांना प्रति जनावर प्रतिदिन 5 किलो मुरघास 3 महिन्यांच्या (90 दिवस) कालावधीसाठी देय असून, त्यासाठी प्रती किलो 3 रुपये दराने अनुदान देय आहे. या 19 जिल्ह्यांमधील सर्व पात्र दुग्ध उत्पादक शेतकरी व पशुपालक यासाठी अर्ज करू शकतात. लाभाथ्यांनी मुरघास खरेदीचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केली जाईल. इच्छुक शेतकरी https://vmddp.com/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. प्रत्येक जिल्ह्याने वैरण बियाणे वाटप, चारा उत्पादन आणि मुरघास निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करावा आणि या मोहिमेस क्षेत्रीय स्तरावर प्राधान्य देऊन तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
"राज्यात घोषित झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये पशुधनाला चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने 'मिशन मुरघास' ही मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. शासनाकडून वैरण बियाणे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अतिरिक्त निधीचा पुरेपूर वापर करून, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासात रूपांतर करा; जेणेकरून भविष्यातील टंचाईच्या काळात जनावरांचे पोषण व दूध उत्पादन सुरळीत राहील. विशेषतः विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'मागेल त्याला मुरघास' या विशेष योजनेचा जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. सशक्त पशुधन व समृद्ध शेतकरी हेच आपले ध्येय आहे- डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मौजे जैतापूरने केली ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी*
October, 24 2026
*राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता, सुनिश्चित करण्यासाठी "मिशन मुरघास" मोहीम
October, 24 2026
*एम.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), नंदुरबारच्या आठ विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेसाठी निवड*
October, 24 2026
*एम.के.डी.स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड*
October, 24 2026
*ना पाठांतराची कटकट, ना नापासाची भीती; ‘उल्लास’अंतर्गत होणार परीक्षा, तीन तासांचा अवधी, दिव्यांगांना अतिरिक्त वेळ*
October, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज