*एम.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), नंदुरबारच्या आठ विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेसाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एम.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), नंदुरबारच्या आठ विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेसाठी निवड*
*एम.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), नंदुरबारच्या आठ विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेसाठी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एम.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील रोलर स्केटिंग आणि रोलर हॉकी या क्रीडा प्रकारांतील आठ विद्यार्थ्यांची दिनांक 26 व 27 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या शालेय विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामध्ये विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेच्या क्रीडा विभागाचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक नंदलाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तर क्रीडाशिक्षक जगदीश जाधव यांनीही मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे सेक्रेटरी शुभम दराडे आणि प्राचार्य जिनेश के. यू. यांनी निवड झालेल्या सर्व आठ विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आगामी विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, आगामी स्पर्धेत विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला.



