*असाणे गावातील दुष्काळी परिस्थितीची डॉ. सुप्रियाताई गावित यांच्याकडून पाहणी, पाणीटंचाईच्या प्रश्नावर ग्रामस्थांशी संवाद; विविध उपाययोजनांबाबत चर्चा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*असाणे गावातील दुष्काळी परिस्थितीची डॉ. सुप्रियाताई गावित यांच्याकडून पाहणी, पाणीटंचाईच्या प्रश्नावर ग्रामस्थांशी संवाद; विविध उपाययोजनांबाबत चर्चा*
*असाणे गावातील दुष्काळी परिस्थितीची डॉ. सुप्रियाताई गावित यांच्याकडून पाहणी, पाणीटंचाईच्या प्रश्नावर ग्रामस्थांशी संवाद; विविध उपाययोजनांबाबत चर्चा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील असाणे गावातील दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईची समस्या जाणून घेण्यासाठी डॉ. सुप्रिया गावित यांनी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनां बाबत चर्चा केली.
असाणे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्याने गावासमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करून डॉ. सुप्रियाताई गावित यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (MJP) पाणीपुरवठा प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी मिळाली. गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी वनक्षेत्राजवळ विहीर खोदण्याची मागणी केली. तसेच थेळारी पाडा येथे तलावातून पाणी उपलब्ध करून देण्याबाबत डॉ. सुप्रिया गावित आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली. गावाला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी विविध पर्यायांवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
या पाहणीवेळी गटविकास अधिकारी (BDO) अर्चना वाघमोळे, पाणीपुरवठा अधिकारी सागर बेहरे, असाणे गावच्या सरपंच सौ. सीमा पाटील, सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील, पांडुरंगनाथ पाटील, दिनेश पाटील, संजय पाटील, बापू शेलार, आबा पाटील, नारायण पाटील, राकेश पाटील, राहुल पाटील, निंबा पाटील, ग्रामसेवक सतीश पाटील तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. या पाहणीमुळे असाणे गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आणि ग्रामस्थांच्या मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. गावाला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले.



