*दावे व हरकती सादर करण्याची अंतिम मुदत 26 ऑक्टोबरपर्यंत, नंदुरबार जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी 24 व 25 ऑक्टोबरला विशेष शिबिरे,जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दावे व हरकती सादर करण्याची अंतिम मुदत 26 ऑक्टोबरपर्यंत, नंदुरबार जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी 24 व 25 ऑक्टोबरला विशेष शिबिरे,जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी*
*दावे व हरकती सादर करण्याची अंतिम मुदत 26 ऑक्टोबरपर्यंत, नंदुरबार जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी 24 व 25 ऑक्टोबरला विशेष शिबिरे,जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती सादर करण्यासाठी 26 ऑक्टोबर 206 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. नागरिकांनी दावे व हरकती विहीत कालावधीत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती सादर करण्यासाठी 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली असून, अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विशेषत: नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 (शनिवार व रविवार) रोजी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचा पात्र नागरिकांनी आणि नव मतदारांनी लाभ घ्यावा. या शिबीरात जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे परंतु अद्याप त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवले गेलेले नाही, तसेच मतदार यादीत नाव नोंदणी करणे, नाव वगळणे किंवा पत्ता बदलण्याबाबतचे दावे व हरकती अर्ज संबंधित मतदान केंद्रावर जाऊन थेट सादर करता येणार आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी आणि नव मतदारांनी आपल्या जवळील मतदान केंद्रांना भेट देऊन या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपले नाव मतदार यादीत निश्चित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. मित्ताली सेठी तसेच उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी केले आहे.



