*कापूस श्रेडर घटकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कापूस श्रेडर घटकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत*
*कापूस श्रेडर घटकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) सन 2026 - 27 अंतर्गत राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये कापूस श्रेडर हा घटक राबविण्यात येत आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्था तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी आयुक्तालया मार्फत करण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या 19 जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे. कापूस श्रेडर खरेदीसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना यंत्राच्या किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 75 हजार रुपये तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना यंत्राच्या किमतीच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्यासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin या संकेतस्थळाला भेट द्यावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी आयुक्तालया मार्फत करण्यात आले आहे.



