*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026,नंदुरबार जिल्ह्यातील 423 शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध,पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026,नंदुरबार जिल्ह्यातील 423 शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध,पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026,नंदुरबार जिल्ह्यातील 423 शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध,पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची नंदुरबार जिल्ह्यातील 423 पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एस. वाय. पुरी यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. बँकांनी योजनेच्या पोर्टलवर एकूण 28 हजार 426 थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे.महाआयटीने संगणकीय प्रक्रियेद्वारे 21 हजार 136 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी आधार प्रमाणिकरण 14 हजार 868 पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून उर्वरीत 6 हजार 268 पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण त्वरीत पुर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. योजनेतील पात्र शेतकऱ्यांची कर्जबाकी 31 मार्च 2026 रोजीच्या स्थितीनुसार निश्चित करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची 31 मार्च, 2026 रोजी कर्जथकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्ज निरंक करण्यात येणार आहे. मृत, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित केली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत तपासून विहित प्रक्रिया पूर्ण करावी व योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एस. वाय. पुरी यांनी केले आहे.



