*ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला धामणंदच्या नागझरी नदीवर बंधारा,'प्रथम गावाचा विकास' एकजुटीतून दिला प्रेरणादायी संदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला धामणंदच्या नागझरी नदीवर बंधारा,'प्रथम गावाचा विकास' एकजुटीतून दिला प्रेरणादायी संदेश*
*ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला धामणंदच्या नागझरी नदीवर बंधारा,'प्रथम गावाचा विकास' एकजुटीतून दिला प्रेरणादायी संदेश*
खेड(प्रतिनिधी):-तालुक्यातील धामणंद गावातील ग्रामस्थांनी 'प्रथम गावाचा विकास, श्रमदानातून जलसंधारण, एकजुटीतून समृद्ध गाव' याची प्रचिती आणून दिली. धामणंद येथील महालिंग परिसराची शोभा वाढविणाऱ्या "वर्ष नागझरी" नदीवर श्रमदानातून पाणी अडविण्यासाठी ग्रामस्थ व तरुण कार्यकर्त्यांनी, नदीपात्रातील गाळ काढून, बंधारा बांधला. व कित्येक लिटर पाणी अडविण्यासाठी आपले योगदान दिले. रवींद्र पालांडे यांच्या दुरदृष्टी नेतृत्वाखाली हे काम पूर्ण झाले. यावेळी जेष्ठ व श्रेष्ठ वरिष्ठ यशवंत पालांडे, गजानन पालांडे, विष्णु कदम, दत्ताराम पालांडे, दत्ता म्हापदी, सौ. सुजाता पालांडे, परशुराम शिंदे, बळीराम जाधव, विष्णू सुतार, अनिकेत म्हापदी सखाराम पालांडे, संदेश म्हापदी, सुभाष कदम इतर मान्यवर उपस्थित होते. आज ग्रामस्थांच्या एकजुटीचे दृश्य त्यानिमित्ताने दिसून आले. बंधारा बांधण्यासाठी श्रमदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थ व तरुणांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.



