*विकास इंग्लिश मीडियम स्कूल व जी.एस.विद्यामंदिर वडाळी येथे गरबा फेस्टिवल उत्साहात साजरा,700 विद्यार्थ्यांनी केला सामूहिक गरबा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विकास इंग्लिश मीडियम स्कूल व जी.एस.विद्यामंदिर वडाळी येथे गरबा फेस्टिवल उत्साहात साजरा,700 विद्यार्थ्यांनी केला सामूहिक गरबा*
*विकास इंग्लिश मीडियम स्कूल व जी.एस.विद्यामंदिर वडाळी येथे गरबा फेस्टिवल उत्साहात साजरा,700 विद्यार्थ्यांनी केला सामूहिक गरबा*
शहादा(प्रतिनिधी):-शिक्षणासोबत अध्यात्म हे देखील महत्त्वाचे असून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सुप्त कलागुणांना चालना द्या प्रिती पाटील संचालिका विकास इंग्लिश मिडीयम स्कुल, विकास इंग्लिश मीडियम स्कूल वडाळी व जी.एस. विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे नवरात्री उत्सव निमित्ताने विकास गरबा फेस्टिवल 2026-27 चे आयोजन करण्यात आले होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगोत्री फाउंडेशन शहादा विद्यमान अध्यक्षा तथा विकास इंग्लिश मिडीयम स्कुल संचालिका सौ.प्रिती अभिजीत पाटील होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी संचालक तथा पोलीस पाटील गजेंद्रगिरी गोसावी, शिक्षक पालक समितीचे उपाध्यक्ष विनोद बोरसे माता पालक समितीचे अध्यक्षा सौ.जयवंता माळी, सामाजिक कार्यकर्ते तुषार गोसावी, जी.एस. विद्यामंदिर संकुलाचे प्राचार्य ए.आर.चौधरी, कर्तव्यदक्ष पर्यवेक्षक व्ही.एच. जोंधळे आदी. उपस्थित होते दुर्गा माता व विद्यार्थिनीं स्वरूपातील नवदुर्गांचे पूजन व दुर्गा मातेची सामूहिक आरती करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.प्रिती पाटील यांनी शिक्षणासोबत अध्यात्म देखील महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व आपल्या सुप्त कलागुणांना चालना द्यावी असे प्रतिपादन केले सर्व विद्यार्थ्यांनी गरबा फेस्टिवल कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला डीजे च्या आणि गरबाच्या तालावर विद्यार्थी थिरकले आहे जवळपास 700 विद्यार्थ्यांनी सामूहिक गरबा सादरीकरण केले वडाळी ग्रामस्थांनी देखील विद्यार्थ्यांचे व कार्यक्रम आयोजन समितीचे कौतुक केले कार्यक्रम सूत्रसंचालन *विकास इंग्लिश मिडीयम शिक्षिका शितल माळी यांनी केले तर प्रास्ताविक इंग्लिश मिडीयम प्रशासक चंद्रकांत रायसिंग यांनी केले आभार प्रदर्शन आकाश बावा यांनी केले जी.एस. विद्यामंदिर प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विकास इंग्लिश मीडियम स्कूल व जी.एस. विद्यामंदिर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.



