*नगरपरिषदेतर्फे ‘गरबा रंग–सखी संग’ उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बचत गटांच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलसह विविध स्पर्धा, गेम्स आणि बक्षिसांनी कार्यक्रमात रंगत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नगरपरिषदेतर्फे ‘गरबा रंग–सखी संग’ उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बचत गटांच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलसह विविध स्पर्धा, गेम्स आणि बक्षिसांनी कार्यक्रमात रंगत*
*नगरपरिषदेतर्फे ‘गरबा रंग–सखी संग’ उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बचत गटांच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलसह विविध स्पर्धा, गेम्स आणि बक्षिसांनी कार्यक्रमात रंगत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील माता-भगिनींसाठी नंदुरबार नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गरबा रंग–सखी संग’ या गरबा उत्सवाला महिला आणि लहान मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरा शेजारील डोम येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक गरब्याच्या उत्साहासोबतच विविध मनोरंजक उपक्रमांमुळे कार्यक्रमात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला आ. चंद्रकांत रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मेघा राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश शिरीष चौधरी, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सौ. शितल कुणाल वसावे, आरोग्य सभापती प्रितम ठंडोरे, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, शिक्षण विभागाच्या सभापती भावना गुरव, नगरसेविका सोनिया राजपूत, ज्योती पाटील, सायली रघुवंशी, हर्षदा पाटील, शोभा पवार, वंदना साळुंखे, रेखा चौधरी, टीना ठाकूर उपस्थित होते. महिलांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि परस्परांमधील स्नेहभाव वृद्धिंगत करणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात महिलांनी आणि लहान मुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. गरब्याच्या तालावर सहभागी महिलांनी आनंद लुटत उत्सवाची रंगत वाढवली.
कार्यक्रमात ‘बेस्ट ग्रुप’, ‘बेस्ट कॉस्च्युम’, ‘बेस्ट गरबा स्टाइल’ आणि ‘बेस्ट ट्विनिंग’ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय लकी ड्रॉ, विविध गेम्स आणि रंजक प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सहभागी महिलांना बक्षिसे देण्यात आली. त्यामुळे कार्यक्रमात मनोरंजनाची आणि उत्साहाची भर पडली. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत, विविध स्पर्धा आणि बचत गटांच्या स्टॉलमुळे ‘गरबा रंग–सखी संग’ हा उत्सव आनंददायी वातावरणात पार पडला. नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या या उपक्रमातून महिलांसाठी मनोरंजन, कलागुणांना वाव आणि बचत गटांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला.



