*ताम्हाणे गावात मयुरी आणि प्रशांत कडू या दांपत्याने फुलवली झेंडूची बाग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ताम्हाणे गावात मयुरी आणि प्रशांत कडू या दांपत्याने फुलवली झेंडूची बाग*
*ताम्हाणे गावात मयुरी आणि प्रशांत कडू या दांपत्याने फुलवली झेंडूची बाग*
ताम्हाणे(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे ताम्हाणे गावातील मयुरी आणि प्रशांत कडू या दाम्पत्याने आपल्या घराबाहेरील जवळपास अर्धा एकर जागेत झेंडूचा मळा फुलवला आहे. गेल्या वर्षी प्रशांत यांनी प्रायोगिक तत्वावर 100 झेंडूची रोपे आणून लागवड केली होती. झाडांचे योग्य संगोपन केल्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळून उत्तम प्रतीची फुले त्यांना मिळाली. या अनुभवातून त्यांनी यंदा सुमारे 3000 झेंडूची रोपे लावून गतवर्षीच्या प्रयोगाचा पुढचा टप्पा पार केला. याकामी त्यांच्या नवविवाहित पत्नी मयुरी यांनीही थेट शेतात उतरून सर्व कामात हातभार लावला. नांगरणी, फवारणी, मशागत यांसह सर्व गोष्टीत त्यांनी पुढाकार घेतला. थोडीफार मेहनत घेतली तर यश नक्की मिळत अशी प्रशांत यांची धारणा आहे. तसेच शेती राखली पाहिजे हे या दाम्पत्याचे ठाम मत आहे. या सकारात्मकतेमुळेच ते शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांच्या शेतामध्ये इंद्रायणी जातीचा तांदूळ बहरला असून काही दिवसात कापणीला येईल. ते रोज सरासरी एक ते दोन तास आपल्या शेतात घालवतात. नुकतीच झेंडूची फुले तोडणीला आलेली आहेत. सध्या नवरात्री उत्सवामुळे त्यांच्या फुलांना परिसरात चांगली मागणी असून फुलांचा चांगला खप होत आहे. सध्या बागेत पिवळा आणि केशरी अशा दोन रंगाचे झेंडू उपलब्ध आहेत व किरकोळ व घाऊक विक्री सुरू आहे. एका बाजूला कोकणात रोजगार नाही, उत्पन्नाचे साधन नाही असा समज दृढ होत घरे बंद होत असताना या नवविवाहित दांपत्याने शेतीमध्ये टाकलेले पाऊल नक्कीच क्रांतिकारी म्हणावे लागेल. तालुक्यात कोणाला दसरा किंवा इतर कार्यासाठी झेंडू फुले हवी असतील तर७५१७२०७१२५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.



