*विद्याविहार येथील पुलास 'पद्मश्री नाना पाटेकर सेतू' नाव द्यावे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विद्याविहार येथील पुलास 'पद्मश्री नाना पाटेकर सेतू' नाव द्यावे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी*
*विद्याविहार येथील पुलास 'पद्मश्री नाना पाटेकर सेतू' नाव द्यावे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी*
मुंबई(प्रतिनिधी):-विद्याविहार मधील एम. जी. रोड येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलास 'पद्मश्री नाना पाटेकर सेतू' असे नाव देण्यात यावे अशी मागणी ईशान्य मुंबई विभाग क्रं.08 च्या वतीने विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील यांनी मुंबईच्या महापौर सौ. रितू तावडे, मुंबई महानगरपालिका आयुक्त मा. श्रीमती अश्विनी भिडे आणि ‘एन’ विभाग प्रभाग समिती अध्यक्षा सौ. अश्विनी मते यांना निवेदनाद्वारे केली आहे. मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे, तसेच नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी आणि गरजूंच्या मदतीसाठी मोलाचे कार्य करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र पद्मश्री नाना पाटेकर यांच्या नावाने या पुलाचे नामकरण व्हावे, ही आमची ठाम मागणी आहे. मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा गौरव, मराठी अस्मितेचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या सुपुत्राला योग्य आदरांजली ठरेल हीच या मागणीमागील भावना असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी सुनील मोरे (नगरसेवक, प्रभाग क्र. 123 व बेस्ट समिती सदस्य) सौ. स्वरूपा पाटील (नगरसेविका, प्रभाग क्र. 127 व आरोग्य समिती सदस्या), अजितजी गुजर (उपविभागप्रमुख)
अजित भायजे (उपविभागप्रमुख),
इम्रान शेख (विभाग समन्वयक)
अशोक वंडेकर (विभाग संघटक), प्रकाश वाणी (विधानसभा कार्यालयप्रमुख), अजय मंडलिक (शाखाप्रमुख) तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.



