*महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2026चा निकाल जाहीर,श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ, तळोदा जिल्ह्यात प्रथम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2026चा निकाल जाहीर,श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ, तळोदा जिल्ह्यात प्रथम*
*महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2026चा निकाल जाहीर,श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ, तळोदा जिल्ह्यात प्रथम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा -2026चा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ, तळोदा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर सहमंगल भांतू समाज सेवा संघ संचलित संत शिरोमती कबीरदास व्यायामशाळा, नंदुरबार यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
जिल्हास्तरीय प्रथम विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन 16 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले आहे. या समारंभात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिकाची रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संतोष बोदडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.