*शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत*
*शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासांठी ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडूंनी 15 नोव्हेंबर, 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे- निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरीता शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकाकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक ) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) तसेच पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासनाने 29 डिसेंबर, 2023 तसेच 25 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली 2023 विहित केली असून या नियमावलीनुसार सन 2024- 2025 व 2025- 2026 या वर्षांसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी 12 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर, 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. पुरस्काराविषयी अधिक माहिती व अर्जाचे नमूने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडूंनी ऑनलाईन अर्ज 15 नोव्हेंबर,2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सादर करावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे- निंबाळकर यांनी केले आहे.



