*डम्पर व टिपर वाहनांवर कव्हरिंग यंत्रणा व अलर्ट सिस्टीम बसविणे अनिवार्य, 1 एप्रिल 2027 पासून नियमांची अंमलबजावणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डम्पर व टिपर वाहनांवर कव्हरिंग यंत्रणा व अलर्ट सिस्टीम बसविणे अनिवार्य, 1 एप्रिल 2027 पासून नियमांची अंमलबजावणी*
*डम्पर व टिपर वाहनांवर कव्हरिंग यंत्रणा व अलर्ट सिस्टीम बसविणे अनिवार्य, 1 एप्रिल 2027 पासून नियमांची अंमलबजावणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व डम्पर व टिपर वाहनधारकांनी 1 एप्रिल 2027 पूर्वी आपल्या वाहनांवर नियमानुसार कव्हरिंग यंत्रणा व ऑडिओ-व्हिज्युअल अलर्ट सिस्टीम बसवून घ्यावी. विहित मुदतीनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलवडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 138 (4) मधील सुधारणेनुसार, 1 एप्रिल 2027 पासून सर्व डम्पर व टिप्पर वाहनांच्या लोड बॉडीवर वाहन रस्त्यावर चालू असताना ती पूर्णपणे झाकली जाईल, अशी विद्युत, विद्युत- यांत्रिक, हायड्रॉलिक अथवा यांत्रिक पद्धतीने कार्यरत कव्हरिंग यंत्रणा बसविणे आवश्यक आहे.
तसेच, लोड बॉडीचे कव्हर उघडे असल्यास किंवा असुरक्षित स्थितीत असल्यास चालकाला तत्काळ सूचना मिळावी, यासाठी वाहनाच्या चालक कक्षात(कॅबिनमध्ये) ऑडिओ- व्हिज्युअल अलर्ट सिस्टीम बसविणे अनिवार्य करण्यात आली आहे. या कव्हरिंग यंत्रणेमुळे वाहनाची एकूण उंची मोजताना सदर यंत्रणा विचारात घेतली जाणार नाही, अशी तरतूद नियम 93 मध्ये करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व डम्पर व टिपर वाहनधारकांनी 1 एप्रिल 2027 पूर्वी आपल्या वाहनांवर नियमानुसार कव्हरिंग यंत्रणा व ऑडिओ-व्हिज्युअल अलर्ट सिस्टीम बसवून घ्यावी. विहित मुदतीनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची सर्व वाहनधारक व चालकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलवडे यांनी केले आहे.



