ताजा खबरे:
*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*
*एकलव्य विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी*
*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*
*व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा उघड गैरवापर, शासनाचे आदेश कागदावरच,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*
*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*

  • Share:

*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने सन 2026-207 या वर्षासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वैरण उत्पादन कार्यक्रमातील चारा बियाणे व ठोंबे वाटपाच्या अटी व शर्ती शिथिल केल्या आहेत. याबाबत पशुसंवर्धन विभागाने 14 ऑक्टोबर 2026  रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
राज्यात प्रथम कळ व दुसरी कळातील 304 तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या परिस्थितीत जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने शासनाने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेंतर्गत 9 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक लाभार्थ्याकडे स्वतःचे किमान तीन ते चार पशुधन असणे आवश्यक होते. मात्र, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता ही अट सन 2026-27 या वर्षापुरती शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांना एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत 100 टक्के अनुदानावर चार हजार रुपये किमतीचे चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी समूह गटांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत 100 टक्के अनुदानावर 20 हजार रुपये किमतीचे चारा बियाणे देण्यात येणार आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ वर्षातून एकदाच घेता येत होता. सुधारित निर्णयानुसार, चारा उत्पादनासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असल्यास पात्र वैयक्तिक लाभार्थी आणि शेतकरी समूह गटांना वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा चारा बियाण्यांचा लाभ घेता येणार आहे. मात्र, प्रथमच लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अन्य पात्र अर्जदारांची मागणी प्रलंबित नसल्यासच पुन्हा लाभ देण्यात येईल. पुन्हा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकरी किंवा शेतकरी समूह गटाकडे चारा उत्पादनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध असल्याची खातरजमा करून संबंधित उपायुक्त, पशुसंवर्धन यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. तसेच प्रथमच लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अन्य पात्र अर्जदारांची मागणी नसल्याची अट लागू राहणार आहे. ही विशेष सवलत केवळ सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी लागू राहील. दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, स्थानिक पातळीवर चारा उत्पादन वाढविणे आणि पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देणे या उद्देशाने शासनाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांना चारा उत्पादनाच्या अधिक संधी मिळणार असून, संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होईल. नंदुरबार जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेंतर्गत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*
October, 15 2026
*एकलव्य विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी*
October, 15 2026
*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*
October, 15 2026
*व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा उघड गैरवापर, शासनाचे आदेश कागदावरच,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*
October, 15 2026
*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*
October, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज