ताजा खबरे:
*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*
*एकलव्य विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी*
*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*
*व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा उघड गैरवापर, शासनाचे आदेश कागदावरच,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*
*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*

  • Share:

*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव  ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*
मुंबई(प्रतिनिधी):-दृकश्राव्य माध्यमांमध्ये समान भाषेतील उपशीर्षके (subtitles) उपलब्ध झाल्यामुळे भाषेचे आकलन आणि वाचन वाढण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे निश्चितच भाषा शिक्षणाला गती येईल, असा विश्वास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला. वरळी येथील दूरदर्शन केंद्रात प्लॅनेट रीड ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ सिंह यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.  त्यानंतर दूरदर्शन केंद्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दूरदर्शन केंद्र मुंबईचे उपसंचालक (अभियांत्रिकी) हेमंत देसाई, गणेश अय्यर आणि आयआयटी दिल्लीचे सहाय्यक प्राध्यापक तथा ‘बिलियन रीडर्स’चे प्रमुख प्रा. ब्रिज कोठारी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील मराठी मनोरंजन कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेतून देवनागरी लिपीत उपशीर्षके (subtitling) देण्यात येणार आहेत. यामुळे कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचे मराठी वाचन होणार आहे. मराठी भाषा वाचनाला यामुळे चालना मिळेल. विद्यार्थी तसेच श्रवणदिव्यांगांना याचा मोठा लाभ होईल. अशा प्रकारे प्रादेशिक भाषेतून उपशीर्षके देण्याच्या या उपक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाराष्ट्रातून झाली आहे. या उपक्रमाची सुरुवात राज्य शासन, प्रसार भारती, आयआयटी दिल्ली आणि प्लॅनेट रीड यांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले, या अभिनव उपक्रमामुळे श्रवणदिव्यांग व्यक्तींनाही कथा, कथानक आणि पटकथेतील घडामोडी समजून घेता येतील. लिखित शब्दाचे महत्व जपणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे. दैनंदिन व्यवहारात भाषा बोलणाऱ्या अनेकांना लिखित भाषेचे संपूर्ण विश्व उपलब्ध होत नाही. त्यामुळे लिखित शब्दाचे महत्त्व हरवू देता कामा नये. समान भाषेतील उपशीर्षके हा त्यासाठीचा सोपा आणि परिणामकारक तंत्रज्ञानाधारित उपाय आहे, असेही सिंह म्हणाले. नागरिकांचा पडद्यावरील वेळ वाढत असताना त्याच पडद्यावर समान भाषेतील उपशीर्षके उपलब्ध झाल्यास आशयाच्या संदर्भासह भाषा सहजपणे शिकता येते. उपशीर्षकांमुळे प्रेक्षकांचे भाषेशी नाते अधिक दृढ होऊन भाषेचे आकलनही वाढते. विशेषतः श्रवणदिव्यांग व्यक्तींना पडद्यावरील कथा आणि घटनाक्रम समजण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असेही सिंह यांनी सांगितले. प्रा. ब्रिज कोठारी यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेचा प्रसार आणि वाचनवृद्धीविषयी माहिती दिली. संतोष जाधव यांनी उपशीर्षक प्रक्रियेचे सादरीकरण केले, तर देवेश कुमार यांनी ‘प्लॅनेट रीड’ आणि भाषा उपशीर्षक उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीनता घाग आणि पूर्वा कर्वे यांनी केले. चेतना पवार यांनी आभार मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*
October, 15 2026
*एकलव्य विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी*
October, 15 2026
*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*
October, 15 2026
*व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा उघड गैरवापर, शासनाचे आदेश कागदावरच,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*
October, 15 2026
*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*
October, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज