*आर.सी.सी. ब्लॉक स्टोन पुरवठ्यासाठी दरपत्रक सादर करावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आर.सी.सी. ब्लॉक स्टोन पुरवठ्यासाठी दरपत्रक सादर करावे*
*आर.सी.सी. ब्लॉक स्टोन पुरवठ्यासाठी दरपत्रक सादर करावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत पुनर्वसन गावठाणांमधील प्रकल्पबाधितांना शासनाकडून वाटप करण्यात आलेल्या जमिनींची मोजणी व सीमांकन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सिमेंटच्या आर. सी.सी. ब्लॉक स्टोनच्या पुरवठ्यासाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुनर्वसन अधिकारी शाम वाडकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सदर कामासाठी 6 x 8 x 30 आकाराचे सिमेंटचे आर.सी. सी. ब्लॉक स्टोन पुरविणे, तसेच जमिनीत 1 x 1 x 2 फूट खोलीपर्यंत खड्डा खोदून सिमेंटच्या साहाय्याने ब्लॉक स्टोन रोवून खुणा निश्चित करणे आवश्यक आहे. या कामासाठी मजुरांच्या मजुरीसह प्रति नग दराचे दरपत्रक सादर करावे. पुरवठा निश्चित झाल्यानंतर संबंधित दरपत्रकातील दर एक वर्षासाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत, यापैकी जो कालावधी कमी असेल त्या कालावधीसाठी बंधनकारक राहतील. यासंदर्भातील अटी व शर्ती जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर Nandurbar.nic.in प्रसिद्ध करण्यात आली आहे.



