*जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत एकलव्य स्कूलचे विजेतेपद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत एकलव्य स्कूलचे विजेतेपद*
*जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत एकलव्य स्कूलचे विजेतेपद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शालेय जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारच्या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या विजयामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे 14 ऑक्टोबर 2026 रोजी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर एकलव्य स्कूलचा संघ 22 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक समन्वय, जिद्द, शिस्त आणि मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केले. शाळेचे क्रीडा शिक्षक सौरव पांडे यांनी खेळाडूंना नियमित सराव, सांघिक खेळ आणि स्पर्धेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य अनिल मंगळे यांनी विजयी संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विभागीय स्तरावरही संघाने उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक उंचवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अशी माहिती एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबार प्राचार्य अनिल मंगळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.



