ताजा खबरे:
*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*
*एकलव्य विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी*
*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*
*व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा उघड गैरवापर, शासनाचे आदेश कागदावरच,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*
*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*संतसेना गणेश मंडळ फाउंडेशनतर्फे ‘कन्या जन्मोत्सव योजना’ सुरू कन्या जन्माचे आनंदाने स्वागत करून मुलींच्या जन्माविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा उपक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*संतसेना गणेश मंडळ फाउंडेशनतर्फे ‘कन्या जन्मोत्सव योजना’ सुरू कन्या जन्माचे आनंदाने स्वागत करून मुलींच्या जन्माविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा उपक्रम*

  • Share:

*संतसेना गणेश मंडळ फाउंडेशनतर्फे ‘कन्या जन्मोत्सव योजना’ सुरू कन्या जन्माचे आनंदाने स्वागत करून मुलींच्या जन्माविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा उपक्रम*
शहादा(प्रतिनिधी):-समाजात मुलींच्या जन्माचे आनंदाने स्वागत व्हावे, कन्या जन्माकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जावे आणि मुलगी जन्माला येणे ही आनंदाची व अभिमानाची बाब असल्याची भावना समाजात रुजावी, या उदात्त उद्देशाने संतसेना गणेश मंडळ फाउंडेशन, शहादा यांच्या वतीने ‘कन्या जन्मोत्सव योजना’ या अभिनव सामाजिक उपक्रमाचा नवरात्रीच्या पर्वावर शुभारंभ करण्यात आला.
शहादा शहरातील संतसेना गणेश मंडळ फाउंडेशन गांधीनगर तर्फे गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ‘सती- गती योजना’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमासोबतच समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या हेतूने ‘कन्या जन्मोत्सव योजना’ सुरू करण्यात आली आहे. कन्या जन्माचे स्वागत, मुलींबाबत असलेले गैरसमज दूर करणे, मुलगा -मुलगी समानतेचा विचार समाजात दृढ करणे आणि मुलींच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्याची सामाजिक मानसिकता निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुलगी ही कुटुंबाचा आणि समाजाचा अभिमान आहे, हा विचार प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवून मुलींच्या सन्मानाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शहादा नगरपालिकेच्या  नगरसेविका ममता  पवार यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्धव जांभळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक हिरालाल बोरदेकर, संतसेना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुभाष सोनवणे, संतसेना समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव, शहादा  विभागीय  गुजर नाभिक समाज पंच मंडळ अध्यक्ष भूषण पवार, आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय सहायक हेमराज पवार, सामाजिक कार्यकर्ते चतुर राजपूत, रवी राजपूत, तळोदा नगर परिषदेचे नगरसेवक दीपक चौधरी, अशोक जाधव यांच्यासह अखिल भारतीय गुजर नाभिक समाजाचे पदाधिकारी, संचालक, ज्येष्ठ समाजसेवक, विविध संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी, नंदुरबार व भालेर विभागीय अध्यक्ष, समाजबांधव, भगिनी, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटक ममता पवार यांनी, मुलीच्या जन्माचे आनंदाने स्वागत करून तिच्या आगमनाचा उत्सव साजरा करणे, ही समाजपरिवर्तनाची महत्त्वपूर्ण सुरुवात असून घरात कन्यारत्न जन्माला आल्यावर तिचे स्वागत करून कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा करावा. मुलगा-मुलगी असा भेद न करता मुलींनाही समान प्रेम, सन्मान आणि शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, हा या योजनेचा स्तुत्य हेतू असल्याचे प्रतिपादन केले. प्रा. सुभाष सोनवणे यांनी, कन्येच्या जन्माचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण समाजाने साजरा करीत आनंदोत्सवाची परंपरा रुजल्यास  मुलींचा सन्मान, समानतेची भावना आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. अशोक सोनवणे यांनी, ‘सती -गती योजना’ आणि ‘कन्या जन्मोत्सव योजना’ या दोन्ही उपक्रमांमुळे समाजात सामाजिक जाणीव, संवेदन शीलता,समानतेची भावना आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसंगी उद्धव जांभळे, प्रकाश जाधव, हिरालाल बोरदेकर, हेमराज पवार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनिल साळुंके, प्रास्ताविक पंकज  जांभळेकर तर आभार पंकज जांभळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  निलेश जांभळे, सुनील बोरदेकर, चेतन जांभळे, धर्मदास जांभळे, अतुल सोनवणे, पंकज जांभळे, लक्ष्मण बोरदेकर, प्रवीण जांभळे सह श्री. संतसेना गणेश मंडळ फाउंडेशनचे संचालक व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*
October, 15 2026
*एकलव्य विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी*
October, 15 2026
*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*
October, 15 2026
*व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा उघड गैरवापर, शासनाचे आदेश कागदावरच,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*
October, 15 2026
*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*
October, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज