*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये वाचन प्रेरणा दिन व डॉ.कलाम जयंती उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये वाचन प्रेरणा दिन व डॉ.कलाम जयंती उत्साहात साजरा*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये वाचन प्रेरणा दिन व डॉ.कलाम जयंती उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन आणि भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि ज्ञानाची व्याप्ती वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. नियमित वाचनामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी व्याख्यान दिले. त्यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्यावर, वैज्ञानिक योगदानावर आणि प्रेरणादायी विचारांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासून ज्ञान संपादन करावे आणि डॉ. कलाम यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. या उपक्रमाचे संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती योगिता गणेश पाटील आणि सचिव गणेश गोविंद पाटील यांनी कौतुक केले.



