*लोहगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय चर्चेला उधाण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लोहगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय चर्चेला उधाण*
*लोहगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय चर्चेला उधाण*
नरसी(प्रतिनिधी):-नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या लोहगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अशातच काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजयअप्पा बेळगे आणि भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड हे दोन्ही नेते एकत्र बसून हितगुज करताना दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दोन्ही नेते वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी संबंधित असून, त्यांचा पूर्वीचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनुभव आहे. त्यामुळे या दोघांची एकत्रित भेट ही केवळ सदिच्छा भेट होती की आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काही राजकीय विषयांवर चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लोहगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये यंदाच्या निवडणुकीत नेमके कोणते राजकीय समीकरण पुढे येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या चर्चेत माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी पं. स. सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. नव्या चेहऱ्याला संधी मिळणार का, याकडे स्थानिक राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. श्रावण भिलवंडे यांच्या संभाव्य भूमिकेमुळे निवडणुकीच्या चर्चेला नवा आयाम मिळू शकतो त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे लोहगाव सर्कल मधील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्याचबरोबर आगामी काळात विविध पक्षांची भूमिका, संभाव्य उमेदवारांची नावे आणि स्थानिक पातळीवरील राजकीय जुळवाजुळव यावर या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे.



