*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये दुर्गा पूजोत्सव साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये दुर्गा पूजोत्सव साजरी*
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये दुर्गा पूजोत्सव साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल, प्रतिभा नगर, नंदुरबार येथे दुर्गा पूजोत्सवाच्या निमित्ताने विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ज्युनिअर के.जी. आणि सिनिअर के.जी.च्या पहिल्या व दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी दुर्गा मातेच्या नवरूपांचे नाट्यरूप सादर केले. विद्यार्थ्यांनी दुर्गा पूजा उत्सव मंडळाच्या माध्यमातून दुर्गा मातेच्या नऊ रूपांचे विविध स्वरूप प्रभावीपणे प्रदर्शित केले. त्यांच्या आकर्षक वेशभूषा, भावपूर्ण अभिनय आणि आत्मविश्वासाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांनी सर्व घटनांचे प्रसंग आकर्षकपणे सादर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि किशोर वाणी हे होते, त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी प्राचार्य डॉ. छाया शर्मा, उपप्राचार्य, समन्वयक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



