*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार*
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एलजिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 31 ऑगस्ट, 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, आता नागरिकांना 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2026 असा राहील. तसेच दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. मयत, स्थलांतरित व दुबार मतदारांच्या नोंदींबाबत हरकती नोंदविण्याचे आवाहन, मयत, स्थलांतरित व दुबार मतदारांची यादी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या nandurbar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), ग्रामपंचायत कार्यालये, गटविकास अधिकारी कार्यालये, नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालये आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या सूचना फलकांवरही ही यादी उपलब्ध आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी तसेच विधानसभा, विधानपरिषद आणि लोकसभा सदस्यांनाही ही यादी देण्यात आली आहे. या यादीतील नावांबाबत किंवा नोंदींबाबत काही आक्षेप अथवा म्हणणे असल्यास संबंधित नागरिक व पक्षीय प्रतिनिधींनी 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत संबंधित विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे आपले म्हणणे सादर करावे.जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिक, मतदार आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी. मतदार यादीत अद्याप नाव समाविष्ट झाले नसलेल्या नागरिकांनी तसेच नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलांत दुरुस्ती करावयाची असलेल्या नागरिकांनी विहित नमुन्यात अर्ज करून वाढीव मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी केले आहे.



