*साईबाबा शिर्डी संस्थानच्या 488 कर्मचाऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल,असंघटित कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साईबाबा शिर्डी संस्थानच्या 488 कर्मचाऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल,असंघटित कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश*
*साईबाबा शिर्डी संस्थानच्या 488 कर्मचाऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल,असंघटित कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-संपूर्ण राज्याचे आणि देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या 488 कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आला.संस्थानमध्ये कार्यरत 488 कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी कर्मचारी महासंघाने सातत्याने लढा दिला आणि अखेर यश आल्याचे समाधान राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी व्यक्त केले. या संदर्भात प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात रणजीतसिंग राजपूत यांनी म्हटले आहे की,
शिर्डी येथील साई बाबा संस्थानच्या 488 कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम होण्याच्या प्रलंबित प्रश्नाला उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण परवानगी श्री साईबाबा संस्थान मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमल बजावणीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक बाबीं करिता संस्थानच्या वतीने उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करताना राज्य कर्मचारी महासंघाने कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. चार वर्षापूर्वी हनुमान जयंती दिवशी शिर्डी येथील असंघटित कामगारांनी सामूहिक मुंडण आंदोलन केले होते. राज्य कर्मचारी महासंघाने या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन असंघटित कामगारांच्या प्रश्नाला शासन दरबारी लावून धरले. आवश्यक कायदेशीर सहकार्यही उपलब्ध करून देण्यात आले.
आज उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे या 488 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाला निर्णायक दिशा मिळाली असून, त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला मोठा दिलासा मिळाला आहे.
या ऐतिहासिक टप्प्यावर सर्व कर्मचाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, अहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजीराव कचरे, जिल्हाधिकारी तथा समिती सदस्य डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, तसेच संस्थानचे प्रशासकीय अधिकारी, आस्थापना विभाग व विधी विभाग यांचे आभार व्यक्त केले आहेत.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 488 कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आशा, समाधान आणि आनंदाचा ठरला आहे. असेही रणजितसिंग राजपूत यांनी नमूद केले आहे.



