*मराठी विश्वकोश परिचय परीक्षेत सोनामाई महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश, नंदुरबार जिल्हास्तरीय परीक्षेत सिमरन पठाण हिचा तृतीय क्रमांक, महाविद्यालयीन स्तरावरही विद्यार्थिनींची चमकà
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मराठी विश्वकोश परिचय परीक्षेत सोनामाई महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश, नंदुरबार जिल्हास्तरीय परीक्षेत सिमरन पठाण हिचा तृतीय क्रमांक, महाविद्यालयीन स्तरावरही विद्यार्थिनींची चमकà
*मराठी विश्वकोश परिचय परीक्षेत सोनामाई महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश, नंदुरबार जिल्हास्तरीय परीक्षेत सिमरन पठाण हिचा तृतीय क्रमांक, महाविद्यालयीन स्तरावरही विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी*
शहादा(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026 निमित्त आयोजित मराठी विश्वकोश परिचय परीक्षेत सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महिला महाविद्यालय, शहादा येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत नंदुरबार जिल्हास्तरावर महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु. सिमरन नबाबखाँ पठाण हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच महाविद्यालयीन स्तरावर तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी रोजमीन बानो अख्तर शाह हिने प्रथम क्रमांक, द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी भावना प्रभाकर बोरसे हिने द्वितीय क्रमांक, तर तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी सुमय्या मुख्तार खोकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थिनींना महाविद्यालयातील मराठी विश्वकोश परिचय परीक्षा मार्गदर्शक व समन्वयक प्रा. डॉ. अनिल साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले. मराठी भाषेतील ज्ञानसंपदा, संदर्भसाहित्य आणि विश्वकोशीय माहिती यांविषयी विद्यार्थिनींमध्ये जिज्ञासा निर्माण करण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. जिजामाता कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, नंदुरबार येथे आयोजित बक्षीस वितरण समारंभात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक बाहुरू सोनवणे, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय बोराणे, सहाय्यक संतोष गेडाम, डॉ. स्नेहा खोब्रागडे, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. मनोज गायकवाड, सहाय्यक सचिव ललित कुडमुथे तसेच इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. या यशाबद्दल सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा भारतज्योती आशा जाधव, उपाध्यक्षा प्रतिमा जाधव, सचिव वर्षा जाधव, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुधीर जाधव, सचिव प्रा. संजय जाधव, प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशु जाधव, समन्वयक संजय राजपूत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील, परीक्षा मार्गदर्शक व समन्वयक प्रा. डॉ. अनिल साळुंके, सहसमन्वयक प्रा. डॉ. भारत चाळसे, प्रा. डॉ. प्रसन्ना डांगे, प्रा. डॉ. अनिल पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



