*सेवा संकल्प अभियानांतर्गत नवापूर येथे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ कार्यशाळा संपन्न, माता-बाल आरोग्य सुधारणा व बालमृत्यू कमी करण्यावर भर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवा संकल्प अभियानांतर्गत नवापूर येथे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ कार्यशाळा संपन्न, माता-बाल आरोग्य सुधारणा व बालमृत्यू कमी करण्यावर भर*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत नवापूर येथे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ कार्यशाळा संपन्न, माता-बाल आरोग्य सुधारणा व बालमृत्यू कमी करण्यावर भर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमाची तालुकास्तरीय कार्यशाळा नवापूर येथील सुरुपसिंग नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश मावची आणि तालुका आरोग्य विस्तार अधिकारी नरेंद्र गोसावी यांनी अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि गावपातळीवर राबवावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गाव पातळीवर प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणे, बालमृत्यू कमी करणे आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेस गटविकास अधिकारी देविदास देवरे, बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, ए.एन. एम., एम.पी. डब्ल्यू., आरोग्य सहाय्यक व सहायिका, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक उपस्थित होते. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विविध विभागांच्या समन्वयातून गावपातळीवर आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबवून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर कार्यशाळेत भर देण्यात येत आहे.