*देवरे विद्यालयात डिजिटल वर्गाचे लोकार्पण,वार्षिक बक्षीस वितरणासह विद्यार्थी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात डिजिटल वर्गाचे लोकार्पण,वार्षिक बक्षीस वितरणासह विद्यार्थी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन संपन्न*
*देवरे विद्यालयात डिजिटल वर्गाचे लोकार्पण,वार्षिक बक्षीस वितरणासह विद्यार्थी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी, संचलित 'मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा' टप्पा-2 उपक्रमांतर्गत नंदुरबार तालुक्यातील प्रथम क्रमांक प्राप्त आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे संस्थापक अध्यक्ष आत्माराम धवळू देवरे यांच्या चौदाव्या पुण्यतिथी निमित्ताने लोकसहभागातून डिजिटल वर्गाचे लोकार्पण, वार्षिक बक्षीस वितरण व विद्यार्थी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, से.नि. विभागीयनियंत्रक, रा.प.मं. जळगाव, डी.डी.देवरे, से.नि. मुख्याध्यापक जयहिंद विद्यालय धुळे,ज्येष्ठ संचालिका अनुसयाबाई आत्माराम देवरे, कार्यक्रमाचे व्याख्याते, से.नि. प्रा.गोपाल पवार यांच्या हस्ते शालेय समितीच्या अध्यक्षा शैलजा देवरे, प्राचार्य नरेंद्र देवरे, सी.डी.देवरे माध्य. व उच्च माध्य. विद्यालय म्हसदी, संचालक पुंजाराम पाटील, संचालक प्रकाश अकलाडे, वेडू खैरनार मुख्याध्यापिका वर्षा देवरे, गंगामाता कन्या विद्यालय म्हसदी, एस.जे. पाटील से.नि.शिक्षक,साधना शेवाळे,जिल्हा स्काऊट संघटक, महेंद्र वसावे,भारत भारत स्काऊट गाईड विभाग नंदुरबार, विखरण येथील सरपंच भारती पाटील, उपसरपंच रोहिदास मराठे, डी.टी.ओ.सौरभ देवरे, आर.टी.ओ. श्रद्धा देवरे, एस एम पाटील से.नि. शिक्षण विस्तार अधिकारी, प्रमोद शेवाळे, यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन होऊन लोक सहभागातून डिजिटल वर्गाचे
उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक अहवाल वाचन विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांनी केले. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी व अहिराणीतून मनोगत व्यक्त केले तसेच स्व. आप्पासाहेबांबद्दल व शाळेवर आधारित स्वलिखित गीते सादर करण्यात आली. मान्यवरांच्या सन्मानानंतर वर्षभर तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर, नवोदय, स्कॉलरशिप, एन. एम.एम.एस. इ. दहावी गुणवत्ता यादीत स्कॉलर शिप पात्रधारक सुयश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. व्याख्याते प्रा. गोपाल पवार यांनी 'बदलते जग व आपण' या विषयावर व्याख्यानाव्दारे सध्याची पिढी त्यांची मानसिकता निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामधील असलेली कर्तृत्व व समवयस्क व्यक्ती यांच्यामधील दरीचे विश्लेषण करून विद्यार्थी व युवकांनी नवीन युगात प्रगती साधतांना आपली संस्कृती विचार व ज्येष्ठांना मान सन्मान व त्यांचा आदर ठेवून दैनंदिन जीवन जगताना समतोल कसा साधला हे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणातून राजेंद्र देवरे यांनी विविध उपक्रमांची दखल घेत याच स्वरूपामध्ये विद्यालयाची प्रगती करण्याचे आवाहन विद्यार्थी पालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतरांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक डी.बी. भारती, डॉ.आर. आर.बागुल व आभार एस.एच. गायकवाड यांनी मानले. उपस्थित सर्व मान्यवर व पालक वर्गाने सस्नेहभोजन घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सी. व्ही.नांद्रे, एम.डी. नेरकर, वाय.डी. बागुल, एम.एस. मराठे, ए.एस. बेडसे तसेच जे. एस.पाटील, डी. बी.पाटील,एस.जी.पाटील एच.एम. खैरनार यांनी परिश्रम घेतले.



