*स्वतःची वास्तू साकार होण्यासाठी, सर्वप्रथम वैयक्तिक जिल्हाधिकारी यांनी प्रथम 11000 रुपये देऊन,मतीमंद मुलींच्या व्हिजन एक करोडला सुरुवात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वतःची वास्तू साकार होण्यासाठी, सर्वप्रथम वैयक्तिक जिल्हाधिकारी यांनी प्रथम 11000 रुपये देऊन,मतीमंद मुलींच्या व्हिजन एक करोडला सुरुवात*
*स्वतःची वास्तू साकार होण्यासाठी,सर्वप्रथम वैयक्तिक जिल्हाधिकारी यांनी प्रथम 11000 रुपये देऊन,मतीमंद मुलींच्या व्हिजन एक करोडला सुरुवात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एक हात मदतीचा दिव्यांग सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानुन आंतरराष्ट्रीय कन्या दिनाचे व घटस्थापनेचे औचित्य साधून मतीमंद मुलींना स्वतःची वास्तू व्हावी तसेच गेल्या 33 वर्षे ज्या दिव्यांग माणसाने स्वतः चे घर देखील केले नाही. आणि पेंशनवर उतरले. परंतु स्वतःच्या स्वर्गवासी आईच्या नावाने सुरू केलेली मतीमंद मुलींची शाळा आणि शाळेचे भाडे अठरा हजार भरून, शाळा तशीच मतीमंद मुलींसाठी सुरू आहे. मतीमंद मुलींसाठी स्वयम अर्थ सहाय्यावर चालू ठेवत, आज पुढे नेण्याचा प्रयत्न सूरु आहे. ही शाळा गुरुकुल नगर नंदुरबार येथे सुरू आहे. कायम ,"अ"श्रेणीत आहे. त्यांचा जीवनाचा प्रवास पाहून काही काळ संपुर्ण व्यासपीठही भावुक झाले होते. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी डाॅ.मिताली सेठी, पोलीस अधिक्षक अश्विनी सानप याही चकित झाल्या, आता मात्र सोशल मीडियातील उत्तर महाराष्ट्रातील सर्व रील स्टार बंधू- भगिनी यांनी या कामासाठी स्वतः उडी घेतली आहे. जवळपास चाळीस रीलस्टार, मोबाईल स्टार यांचा काकुमाय अपंग सेवा संस्थेच्या वतीने ट्राफी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते देण्यात आली. नक्कीच रीलस्टार यांच्या माध्यमातून मतीमंद मुलींसाठी शाळा प्रसिद्धीचा विडा उचलला आहे. स्वतःची वास्तू साकार होण्यासाठी यात सर्वप्रथम वैयक्तिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डाॅ. मिताली शेटी यांनी प्रथम 11000 रुपये देऊन मतीमंद मुलींच्या व्हिजन एक करोडला सुरुवात केली. अतिशय दिमाखात कालचा कार्यक्रम पार पडला. यावेळी डाॅ.मिताली शेट्टी, पोलीस अधिक्षक अश्विनी सानप, संस्था अध्यक्ष भास्कर कुवर, संचालिका भारती कुवरसह मोठ्या प्रमाणात समाजाप्रती कर्तव्य असलेली प्रमुख पाहुणे मंडळी उपस्थित होती. प्रस्तावना गणराज कुवर यांनी केले. सुत्रसंचालन अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे जिल्हा सचिव आनंदराव करनकाळ यांनी केले. आमचे असिस्टंट दिव्यांग कमिटीचे सदस्य नेहमी दिव्यांगान बाबत व त्यांच्या अडचणींबाबत चर्चा करत असतात असा नामोल्लेख देखील जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला



