*एकलव्य विद्यालयात जिल्हा बॉल बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात जिल्हा बॉल बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न*
*एकलव्य विद्यालयात जिल्हा बॉल बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील एकलव्य विद्यालय व जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सदर स्पर्धेला प्रमुख उद्घाटक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू जयदीप नटावदकर उपस्थित होते. याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाडूंनी सतत मैदानावर कार्यरत राहावे तरच आपल्याला यश प्राप्ती होते असे प्रतिपादन केले.
स्पर्धेत एकलव्य विद्यालयाचे 17 वर्षे आतील मुली 19 वर्षा आतील मुली व मुले यांचे संघ विजयी झाले असून पुढे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत सदर संघ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे उपमुख्याध्यापक प्रा. डॉ.गिरीश पवार, पर्यवेक्षक टीका पाडवी, तसेच क्रीडाशिक्षक व क्रीडा संचालक सुनील पाटील, धोंडीराम शिनगर, राजेश वळवी उपस्थित होते.



