*मिराज सिनेमागृहात हरवलेली 18 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली पर्स काही तासांत शोधून महिलेच्या स्वाधीन सोन्याचे दागिने सुखरूप मिळताच महिलेस अश्रू अनावर, नंदुरबार शहर पोलिसांसह मिराज सिनेमाच
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मिराज सिनेमागृहात हरवलेली 18 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली पर्स काही तासांत शोधून महिलेच्या स्वाधीन सोन्याचे दागिने सुखरूप मिळताच महिलेस अश्रू अनावर, नंदुरबार शहर पोलिसांसह मिराज सिनेमाच
*मिराज सिनेमागृहात हरवलेली 18 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली पर्स काही तासांत शोधून महिलेच्या स्वाधीन सोन्याचे दागिने सुखरूप मिळताच महिलेस अश्रू अनावर, नंदुरबार शहर पोलिसांसह मिराज सिनेमाच्या कर्मचाऱ्यांचे मानले मनःपूर्वक आभार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील मिराज सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या रंजना मराठे या महिलेची 18 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली पर्स हरविल्याची माहिती मिळताच नंदुरबार शहर पोलिसांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. पोलिसांनी तत्परतेने शोध घेऊन काही तासांतच हरविलेली पर्स शोधून काढली आणि त्यामधील सोन्याचे दागिने सुरक्षितपणे संबंधित महिलेस परत केले. हरविलेली पर्स आणि त्यातील सोन्याचे दागिने सुखरूप परत मिळताच संबंधित महिलेस अश्रू अनावर झाले. मौल्यवान दागिने पुन्हा मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी त्यांनी नंदुरबार शहर पोलिसांसह मिराज सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. रंजना मराठे या मिराज सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. चित्रपट संपल्यानंतर त्या घरी निघून गेल्या, मात्र, यादरम्यान त्यांची पर्स नेमकी कोठे राहिली, हे त्यांच्या लक्षात आले नाही. पर्समध्ये 18 ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याने त्या चिंताग्रस्त झाल्या,
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच नंदुरबार शहर पोलिसांनी तातडीने शोधकार्य हाती घेतले. गुन्हे शोध पथकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक तपास व शोधकार्य केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे काही तासांतच हरविलेली पर्स शोधून काढण्यात यश आले. पर्समधील सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याची खात्री करून सदर पर्स संबंधित महिलेस परत करण्यात आली. मौल्यवान दागिने सुखरूप परत मिळाल्याचा आनंद आणि सुटकेची भावना यामुळे महिलेच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांनी पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल समाधान व्यक्त करत मनःपूर्वक आभार मानले.
हरविलेली मालमत्ता शोधून ती संबंधित व्यक्तीस सुरक्षितपणे परत मिळवून देणे, हे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे आणि नागरिकांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी असलेल्या बांधिलकीचे उदाहरण आहे. या घटनेत नंदुरबार शहर पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मिराज सिनेमागृहाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेले सहकार्य यामुळे महिलेस तिची मौल्यवान मालमत्ता परत मिळाली. सदर कामगिरी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक भुणेश मराठे, अमोल देशमुख तसेच पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र काटके, रुपेश पगारे आणि निंबा वाघमोडे यांनी केली.नागरिकांची सुरक्षा, मालमत्तेचे संरक्षण आणि जनतेचा विश्वास हेच आमचे ध्येय!



