*सेवा संकल्प अभियानांतर्गत शेलकुई येथे ‘मिशन सक्षम गतिमान’ मार्गदर्शन शिबिर संपन्न, बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगारा बाबत मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवा संकल्प अभियानांतर्गत शेलकुई येथे ‘मिशन सक्षम गतिमान’ मार्गदर्शन शिबिर संपन्न, बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगारा बाबत मार्गदर्शन*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत शेलकुई येथे ‘मिशन सक्षम गतिमान’ मार्गदर्शन शिबिर संपन्न, बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगारा बाबत मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार यांच्या सहभागातून धडगाव तालुक्यातील शेलकुई येथे बेरोजगार युवक- युवतींसाठी ‘मिशन सक्षम गतिमान’ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील बेरोजगार युवक -युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्वावलंबनासाठी प्रोत्साहित करणे हा या शिबिराचा उद्देश होता.
शिबिरात युवक- युवतींना स्पर्धात्मक युगात रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्ये, कौशल्य विकास कार्यक्रम, विविध रोजगाराच्या संधी तसेच शासनाच्या रोजगाराभिमुख योजनांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
युवक-युवतींमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना करिअर निवडीसाठी योग्य दिशा देणे आणि रोजगाराभिमुख दृष्टिकोन विकसित करण्यावर शिबिरात भर देण्यात आला. ग्रामीण भागातील युवक-युवतींच्या कौशल्य विकासाला चालना देऊन त्यांना स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत शेलकुईचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. ‘स्वावलंबी युवक – समृद्ध गाव’ या संकल्पनेतून युवकांनी उपलब्ध संधींचा लाभ घेऊन आपले भविष्य घडवावे, असे आवाहन करण्यात आले.